आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांनाे, बंड करा; नवोन्मेष घडू द्या!, विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी चालणार नाही : जावडेकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शाळेत प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना नाउमेद केले जाते, त्यामुळे भारतात शैक्षणिक नवोन्मेषांचा अभाव आहे. यापुढे अशी मुस्कटदाबी चालणार नाही, असे नवे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.जोपर्यंत तुम्ही बंड करणार नाही, वर्तमानाला आव्हान देणार नाही, मग तुम्ही काही तरी नवे कसे घडवू शकाल? असा सवालही त्यांनी केला.
ते म्हणाले, नवोन्मेष ही बंडाची मूलभूत प्रक्रिया आहे. जोपर्यंत तुम्ही सद्य:स्थितीविरुद्ध बंड करणार नाही, तोपर्यंत तुम्ही नावीन्यपूर्ण काहीच घडवू शकणार नाही मुलांच्या जिज्ञासूवृत्तीला आपण प्रोत्साहन दिले तर सद्य:स्थितीला आव्हान दिले जाईल आणि नावीन्याचा अाविष्कार, परिवर्तन घडून येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

स्मृती इराणींची दांडी!
जावडेकरांनी गुरुवारी सूत्रे स्वीकारली. मात्र, ती देण्यासाठी या खात्याच्या माजी मंत्री स्मृती इराणी फिरकल्याच नाहीत. ‘कौटुंबिक’ कारणांमुळे त्या आल्या नाहीत, असा खुलासा जावडेकर यांनी केला. १० जुलै रोजी पुण्यात आपल्याला शिक्षकांचा सत्कार करून काम सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...