आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखलाकला मारणारे हिंदू असूच शकत नाहीत, देवेंद्र फडणवीसांचे परखड मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दादरीमध्ये घरात बीफ असल्याच्या संशयावरून भडकलल्या काही लोकांनी अखलाकची हत्या केली. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. डाव्या आणि उजव्या विचारांच्या नेत्यांमध्ये तर वाक्युद्धच सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावर एका टीव्ही चॅनेलशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. अखलाकला मारणारे हिंदू असूच शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी ही घटना चुकीचीच असल्याचे ठासून सांगितले आहे.

इंडिया टीव्ही या वाहिनीच्यास एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी संबंधित वक्तव्य केले आहे. असे कृत्य करणारे हिंदू आहेत हेच मी मान्य करणार नाही असे फडणवीस म्हणाले. हिंदू हा केवळ एक धर्म नसून ती एक संस्कृती, एक विचार परंपरा आहे. या परंपरेने आम्हाला सहिष्णुता शिकवली आहे. त्यामुळे अशा प्रकारची घटना ही पूर्णपणे चुकीची असून तिचा निषेध करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कुठेही अशा प्रकारची घटना घडता कामा नये, तसे झाल्यास कोणत्याही धर्माला ती मान्य असू शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या वादग्रस्त विषयावर त्यांच्या शैलीत मत मांडले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा VIDEO