आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डायरी गेट मध्ये सहाराला नव्हे, तर मोदींनाच सूट’, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्या तीव्र प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डायरी गेट प्रकरणात सहारा समूहाला खटल्यापासून सूट मिळाल्याबद्दल राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्राप्तिकर तडजोड आयोगाकडून (आयटीएससी) सहाराला मिळालेली ही सूट सहाराला नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेली सूट आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, मोदींचे मन स्वच्छ असेल तर त्यांना चौकशीची भीती का वाटत आहे? मोदींनी लाच घेतली आहे, असा आरोप करून राहुल गांधी यांनी त्याची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली. दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केली. त्यांनी ट्विट केले की, मोदी स्वत:ला प्रत्येक चौकशीतून वाचवतात आणि आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात सीबीआयचा वापर करतात.दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपल्या तसेच मंत्रिमंडळातील सहकारी सत्येेंद्र जैन यांच्या कार्यालयांवर सीबीआयच्या छाप्यांसाठी पंतप्रधानांवर तीव्र टीका केली. आपल्याला अडकवण्यासाठी एका अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...