आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Still Now Oxygen Provided India Through Iron Cylender

भारतात वैद्यकीय क्षेत्राला आजही लोखंडी सिलिंडरने ऑक्सिनजनचा पुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वैद्यकीय क्षेत्रात आजही लोखंडी सिलिंडरने ऑक्सिजन पुरवठा करणारा भारत एकमेव देश आहे. हे सिलिंडर उद्योगक्षेत्रात वापरण्यासाठी असतात. खरे तर रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅल्युमिनियम सिलिंडरमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन दिले जाणे गरजेचे आहे. थोडेसे पैसे वाचवण्यासाठी रुग्णालये चुकीच्या सिलिंडरचा उपयोग करतात, परंतु त्यामुळे रुग्णाच्या जिवावर बेतू शकते.


श्वासोच्छ्वासाच्या व्याधी असणा-या रुग्णांच्या मदतीसाठी ब्रीथ इझी इंडिया फाउंडेशन मदतीला धावून आले आहे. दिल्लीतील उत्तम ग्रुपची ही धर्मादाय संस्था आहे. फुप्फुसाचा कर्करोग, न्यूमोनिया, पल्मोनरी फायब्रोसिस, सीओपीडी यांसारख्या गंभीर व्याधीग्रस्त लोकांना मदत करण्याचा या संस्थेचा उद्देश आहे. बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा या संस्थेची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होती. दियाने सांगितले होते, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आशियाई देशांपेक्षा भारतात धूम्रपान करणारे लोक अधिक आहेत. जगभरात सीओपीडी (क्रॉनिक ऑब्सस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) व्याधीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.

देशभरात दरवर्षी पाच लाख लोक सीओपीडीमुळे मृत्युमुखी पडतात. श्वसनासंबंधीच्या रुग्णामुळे लोकांनाही त्रास होतो. त्यामुळेच त्यांना व्यावसायिक मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी ब्रीथ इझी संस्थेने फोर्टिस ग्रुपसोबत काम सुरू केले आहे. ही संस्था श्वसनासंबंधी व्याधीबद्दल जनजागृतीचेही काम करते. उत्तम सुपर ब्रँडची ऑक्सिगो किट सर्वात सुरक्षित व उत्कृष्ट आहे. ती हलकी, गंज न चढणारी आणि पोर्टेबलही आहे. ती ऑपरेट करणेही खूप सोपे आहे.