आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sting Operation Exposes Aap Leader Arvind Kejariwal Road Show At Delhi Assembly Election

STING: अरविंद केजरीवालांच्या \'रोड शो\'ला गर्दी जमवण्यासाठी \'आप\'ने वाटली दारु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा 'रोड शो' वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी 20 जानेवारीला वाल्मिक मंदिरापासून जंतर-मंतरपर्यंत 'रोड शो'चे आयोजन केले होते. याला दिल्लीकरांनी तूफान प्रतिसाद दिला होता. मात्र, 'यू-ट्यूब'वरील 'स्टिंग'मध्ये काही वेगळेच चित्र दिसत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

केजरींच्या रोड शोसाठी गर्दी जमवण्यासाठी 'आप' नेत्यांनी लोक आयात केल्याची धक्कादायक माहिती 'स्टिंग'मधून उजेडात आली आहे. 'आप'च्या एका माजी आमदाराने यासाठी एका दलालाची मदत घेतली होती. मालवीय नगरातील झोपडपट्टीतून जास्तीत जास्त संख्येने लोकांना आणण्याच्या सूचना 'आप' नेत्याने दलालाला दिल्या होत्या. विशेष म्हणजे जास्ती जास्त लोकांना गोळा करण्‍यासाठी मद्य आणि भोजनाचे प्रलोभन देण्यात आले होते.
'निवडणूक कोणतीही असो, त्यात मोजून-मापून खर्च केला जात नाही. निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च होत असतो. त्यामुळे 50 ठिकाणी 100 लोक आणा. रोड शो मध्ये गर्दी दिसली पाहिजे. आरामात मद्य प्या, भोजन करा', असे 'आप'चा एक नेता दलालाला सांगितले होते.

सभा आणि रोड शोसाठी लोक आयात करण्यासाठी 800 ते 1000 रुपये मिळतात. यासाठी दिल्लीतील झोपड्या, स्लम वस्ती, बेघर वस्तीतील लोकांना आणले जाते, असे नाव न सांगण्‍याच्या अटीवर एका तरुणाने (दलाल) सांगितले. तसेच तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसल्याचे तो म्हणाला.

यापूर्वी, पश्चिमी दिल्लीतील कॉंग्रेसचे नेत्यांना गेल्या वर्षी डॉ. आंबेडकर नगरातून लोक आयात केले होते. आगामी निवडणुकीत कॉंग्रेससह 'आप'ने देखील लोक आयात करत आहे. गाझियाबाद येथील एका ठेकेदाराला हा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो. त्याच्याकडून लोक गोळा करण्याचे काम आम्हाला दिले जात. विशेष म्हणजे रॅलीच्या दोन दिवसांपूर्वी प्रतिव्यक्तीनुसार रुपये दिले जातात, अशी माहिती 'त्या' तरुणाने दिली.

पुढील स्लाइडवर वाचा, ‘आप’ नेत्याने केली आरोपीची पाठराखण...