आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sting Operation Shocking Details On The Assault On JNUSU President Kanhaiya Kumar

STING: वकिलाची कबुली, 3 तास चोपले तेव्हा कन्हैयाने पँट ओली केली होती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्हैयाला मारहाण करण्याचा आरोप असलेला वकील विक्रमसिंह चौहान - Divya Marathi
कन्हैयाला मारहाण करण्याचा आरोप असलेला वकील विक्रमसिंह चौहान
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) देशविरोधी घोषणा देण्याच्या आरोपात अटकेत असलेला विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला पटियाला हाऊस कोर्ट परिसरात वकिलांकडून मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचा आरोप असलेल्या एका वकिलाने सांगितल्यानुसार, कन्हैया पोलिस कस्टडीत असताना वकिलांनी त्याला तीन तास मारहाण केली होती. विक्रम चौहान नावाचा हा वकील एका चॅनेलच्या स्टिंगमध्ये याबाबत सांगत असताना दिसला आहे. तो म्हणाला, आम्ही कन्हैयाला एवढी मारहाण केली की त्याची पँट ओली झाली होती.

देशद्रोह्यांना सोडणार नाही
- इंडिया टुडे टीव्ही चॅनेलने चौहान आणि त्याचा सहकारी वकील यशपालसिंह याचे स्टिंग ऑपरेशन केले.
- कन्हैयाला मारहाण केल्याचे विक्रम आणि यशपाल यांनी स्टिंगमध्ये मान्य केले. दोघांनीही कन्हैयाला मारहाण करण्याचे षडयंत्र आधीच आखले असल्याचे सांगितले.
- स्टिंगमध्ये वकील चौहान, देशद्रोह्यांना सोडणार नाही, असा म्हणताना दिसतो.
- याच वकीलांवर पत्रकारांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही.
कोण आहे विक्रम सिंह चौहान
- विक्रमसिंह चौहान दिल्ली हायकोर्टात वकील आहे.
- जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला 12 फेब्रुवारी रोजी पटियाला हाऊस कोर्टात हजर करताना झालेल्या गोंधळानंतर चर्चेत आला.
- पटियाला हाऊस कोर्ट परिसरात काही वकिलांनी विद्यार्थी, प्राध्यापक आणि पत्रकारांवर हल्ला केला होता. आरोप आहे की विक्रमसिंहने याचे नेतृत्व केले होते.
पुढील स्लाइडमध्ये, काय आहे व्हिडिओमध्ये