आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टॉकगुरू घोटाळ्यात लाचप्रकरणी प्राप्तिकर उपायुक्त जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्टॉकगुरू घोटाळय़ाचा मुख्य आरोपी रत्नागिरी येथील उल्हास प्रभाकर खैरे याच्याकडून लाच घेतल्याप्रकरणी प्राप्तिकर खात्याच्या उपायुक्ताला अटक केल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी मंगळवारी दिली.
योगेंद्र मित्तल असे या उपायुक्ताचे नाव असून, ते 2006च्या भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. उल्हास खैरेकडून त्यांनी कोट्यवधींची लाच घेतली. जानेवारी 2011 मध्ये खैरेच्या घर, कार्यालयावर छापे टाकण्यात आले. तेव्हा एका व्यक्तीने मित्तल यांच्याकडे ही लाच पोहोचवली होती.
रत्नागिरीच्या खैरेचा 500 कोटींचा घोटाळा
दिल्लीतील या बहुचर्चित 500 कोटींच्या घोटाळय़ाचा पर्दाफाश 14 नोव्हेंबर 2012 रोजी झाला. दिल्ली पोलिसांनी स्टॉकगुरू गुंतवणूक कंपनीचा मालक उल्हास खैरेला पत्नीसह रत्नागिरीत अटक केली होती. त्यांनी 7 राज्यांतील 2 लाख गुंतवणूकदारांची लुबाडणूक केल्याचा आरोप आहे. या पैशांवर जास्तीचे रिटर्न देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते.