(लक्ष्मीनारायण कृष्णमुर्ती यांना स्मार्टफोनच्या जागी साबण मिळाली.)
नवी दिल्ली- ऑनलाईन शॉपिंग करण्याचे काही तोटेही आहेत. दिल्ली आणि मुंबईच्या दोन ग्राहकांना हा अनुभव आला आहे. दोघांनी मोबाईलची ऑनलाईन शॉपिंग केली होती. परंतु, एकाला दगड तर दुसऱ्याला साबण मिळाली. ऑनलाइन कंपन्यांकडून विकल्या गेलेल्या प्रॉडक्टवर गॅरंटी दिली जात नाही. त्यामुळे या दोन ग्राहकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार नोंदवली. त्यानंतर दोन्ही कंपन्यांनी चुक कबुल केली. पण अद्याप ग्राहकांना नुकसान भरपाई दिलेली नाही. सध्या यासंदर्भात तपास सुरु आहे, असे या दोन्ही कंपन्यांनी सांगितले आहे.
प्रकरण पहिले
दिल्लीच्या द्वारका भागात राहत असलेल्या एका कुटुंबाने फ्लिपकार्ट या साईटवरुन
सॅमसंग गॅलेक्झी नोट ३ हा स्मार्टफोन खरेदी केला होता. शनिवारी त्यांना प्रॉडक्ट मिळाले. जेव्हा त्यांनी पार्सलचा बॉक्स उघडला तेव्हा धक्काच बसला. त्यात दगडाचे तुकडे होते. त्यांनी लगेच कंपनीच्या
फेसबुक पेजवर तक्रार नोंदवली. कंपनीने चुक झाल्याचे कबुल करीत माफी मागितली. त्यांना हा स्मार्टफोन पाठविला जाणार आहे.
दुसरे प्रकरण
एका आठवड्यापूर्वी बोरीवली-मुंबई येथील लक्ष्मीनारायण कृष्णमुर्ती यांच्यासोबतही असेच काहीसे घडले. त्यांनी स्नॅपडिल वेबसाईटवर सॅमसंग ड्युओस स्मार्टफोन खरेदी केला होता. पण घरी आलेले पॅकेट बघून त्यांना धक्काच बसता. त्यात कपडे धुण्याची साबण होती. त्यांनी फेसबुक पेजवर याची तक्रार केली. याला आतापर्यंत तब्बल 17 हजार लोकांनी शेअर केले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, यासंदर्भातील फोटो....