नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये 'आप' सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात तणाताणी सुरूच आहे. मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्ली पोलिस दलाचे नियंत्रण राज्य सरकारकडे द्यावे, अशी मागणी केली. शिवाय पोलिस भ्रष्ट आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर हा मुद्दा पकडून पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी हे आज (मंगळवार) म्हणाले, '' आम्ही आमची काळजी घेऊ. त्यांनी त्यांचे काम करावे. त्यांच्याकडेही अनेक समस्या आहेत. सहा मंत्र्यांकडून भ्रष्टाचाराला आळा घालणे त्यांना शक्य झाले नाही'', अशा शब्दांत त्यांनी
केजरीवालांचा समाचार घेतला.
केजरीवाल सरकारमधील अनेक मंत्र्यांना भ्रष्टाचार आणि इतर प्रकरणात कारागृहात जावे लागले. कायदा मंत्री राहिलेले जितेंद्र तोमर यांच्यावर बनावट गुणपत्रिका प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे.
पोलिस सुरू करणार हेल्पलाइन
पोलिस आयुक्त म्हणाले, ‘‘आम्ही एक नवीन हेल्पलाइन सुरू करणार आहोत. यामध्ये भ्रष्ट पोलिसांच्या विरोधात कुणीही आम्हाला ऑडियो- व्हिडियो पुरावा दिला तर त्याला 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. ’’ काही दिवसांपासून केजरीवाल हे पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यानंतर आयुक्तांनी ही घोषणा केली.
केजरीवाल यांनी केली पंतप्रधानांवर टीका
केजरीवाल यांनी आज (मंगळवार) सकाळी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. केजरीवाल यांनी लिहिले, ‘‘मोदीजी, आता हट्ट सोड. आमच्या सोबत काम करा. ACB आणि पोलिस दलाचे नियंत्रण दिल्ली सरकारकडे द्या. आम्ही एकाच वर्षात सगळे व्यवस्थित करून दाखवतो.
पुढील स्लाइड्स पाहा केजरीवाल यांचे ट्वीट्स....