आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stop Hanging, One Handred Eminant Personalities Write Letter To President

मृत्युदंडाची शिक्षाच रद्द करण्याच्या दिशेने मंथन, मान्यवरांचे राष्ट्रपतींना पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - याकूब मेमनला झालेल्या फाशीच्या शिक्षेच्या निमित्ताने देशात एका नव्याच चर्चेला तोंड फुटले आहे. याकूबची फाशीची शिक्षा रद्द करावी, अशी मागणी करणारे १५ पानी पत्र विविध पक्षांचे खासदार, नेते, कायदातज्ज्ञ, सेवानिवृत्त न्यायमूर्ती, शिक्षणतज्ज्ञ, अभिनेते यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवले आहे. फाशीची शिक्षा रद्द करण्याच्या आंतरराष्ट्रीय बांधिलकीच्या मसुद्यावर भारताने केलेली स्वाक्षरी आणि मानवीय मूल्ये यांचा आधार देऊन, या मान्यवरांनी फाशीच्या शिक्षेच्या तरतुदीवरच बोट ठेवले आहे. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची तरतूदच रद्द होते की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.

या पत्रावर खासदार शत्रुघ्न सिन्हा (भाजप), मणिशंकर अय्यर (काँग्रेस), माजिद मेमन (राष्ट्रवादी), सीताराम येचुरी (माकप), डी. राजा (भाकप), के. टी. एस. तुलसी आणि एच. के. दुआ, टी. शिवा (द्रमुक), प्रकाश करात (माकप), दीपांकर भट्टाचार्य, वृंदा करात (माकप), अभिनेते नसिरुद्दीन शहा, महेश भट्ट, एम. के. रैना, सेवानिवृत्त न्यायमूर्ती पानाचंद जैन, एच. एस बेदी, पी. बी. सावंत, एच. सुरेश, के.पी. शिवसुब्रमण्यम, एस. एन. भार्गव, के. चंद्रू, नागमोहन दास, कायदातज्ज्ञ इंदिरा जयसिंह, राम जेठमलानी, शिक्षणतज्ज्ञ इरफान हबीब, अर्जुन देव, डी. एन. झा, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, अरुण रॉय, जीन ड्रेझ, जॉन दयाल यांच्या स्वाक्ष-याअाहेत.

मान्यवरांनी उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे
१. देशाला धार्मिक आधारावर विभाजित करण्याच्या गुन्ह्याचा कट इतर व्यक्तींनीच रचला आहे. त्यामुळे याकूबला माफ करण्याबाबत विचार करावा, अशी विनंती आम्ही करत आहोत.
२. फाशीची शिक्षा रद्द करण्याच्या आंतरराष्ट्रीय बांधिलकीवर भारताने स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही.
३. या प्रकरणात दया दाखवली तर आपला देश दहशतवाद तर खपवून घेत नाहीच, पण एक देश म्हणून आपण दयेच्या शक्तीची अंमलबजावणी करण्यास तसेच माफी, न्याय या मूल्यांचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत, असा संदेश जगात जाईल. रक्तपात, मानवी हत्या यामुळे देश सुरक्षित स्थळ होणार नाही. उलट आपल्या सर्वांचे त्यामुळे अध:पतन होईल.