आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stop Remarks On Meat And Dadri Incident Amit Shah Warn Party Leaders

‘पांचजन्य’च्या लेखाने ‘दक्ष’ भाजपची अडचण; वक्तव्ये थांबवा, नेत्यांना तंबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गोमांस वाद आणि दादरी हत्याकांड प्रकरणी पक्षनेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे विरोधकांच्या टीकेचा भडिमार सहन करावा लागल्याने अडचणीत आलेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी ‘डॅमेज कंट्रोल’मोहीम हाती घेतली. या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्ये देणे त्वरित थांबवा, अशी तंबीच शहा यांनी रविवारी स्वपक्षीय नेत्यांना देऊन ‘दक्ष’ता दाखवली असली तरी दुसरीकडे ‘पांचजन्य’या रा.स्व. संघाच्या मुखपत्राने मात्र भाजपच्या अडचणी वाढवल्या आहेत.

शहा यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय मंत्री महेश शर्मा, संजीव बलियान तसेच खासदार साक्षी महाराज आणि उत्तर प्रदेशमधील आमदार संगीत सोम यांना पक्षाच्या मुख्यालयात बोलावून घेतले आणि अशी वादग्रस्त वक्तव्ये त्वरित बंद करा, अशी तंबी दिली. या प्रकारांमुळे पक्ष आणि सरकारचा विकासाचा अजेंडा रुळावरून खाली घसरत आहे, असे त्यांनी सांगितले. शहा म्हणाले, ‘यूपी सरकार कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर अपयशी ठरले असल्यानेच दादरी कांड घडले, पण वादग्रस्त वक्तव्यांमुळे संपूर्ण लक्ष भाजपकडे केंद्रित झाले. पंतप्रधान या वादांमुळे नाराज आहेत. त्यांना विरोधकांच्या टीकेचा भडिमार सहन करावा लागत आहे.’

‘ही तर गोहत्या पापाची नैसर्गिक प्रतिक्रिया’
‘मदरसे आणि मुस्लिम नेते भारतीय मुस्लिमांना देशाच्या परंपरेबाबत द्वेष पसरवण्यास शिकवतात. इखलाकने कदाचित अशा वाईट कामातून प्रेरणा घेत गोहत्या केली. त्याची हत्या गोहत्येच्या पापाची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे,’ असे ‘पांचजन्य’च्या लेखात म्हटले आहे. दादरी कांडाबाबत ताज्या अंकात मुखपृष्ठ कथा छापण्यात आली आहे. 'इस उत्पात के उस पार' या शीर्षकाखाली तुफेल चतुर्वेदी यांनी हा लेख लिहिला आहे. त्यांचे पूर्ण नाव विनय कृष्ण चतुर्वेदी आहे.

धर्मग्रंथांचा दाखला
लेखात म्हटले आहे की, ‘हिंदूंच्या धर्मग्रंथांत गोहत्या करणाऱ्या पापी व्यक्तींची हत्या करण्याचा आदेश आहे. ८० टक्के बहुसंख्याकांचा आदर करत नसाल, तर अशा प्रतिक्रिया कशा रोखू शकाल?, गोमांस खाण्याच्या अफवेनंतर इखलाकचा मारहाणीत मृत्यू झाला होता. गोहत्या आमच्यासाठी भावनेचा प्रश्न आहे. शेकडो वर्षांपासून आमच्या पूर्वजांनी अशा गोहत्या रोखण्यासाठी प्राणार्पण केले आहे.’

पुढे वाचा.. संघाने झटकले हात