आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा : शेवटच्या क्षणी नेताजींच्या गळ्याला पडली होती कोरड, कोमात असताना झाला मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेताजींच्या संदर्भात विविधप्रकारचे दावे केले गेले आहेत. - Divya Marathi
नेताजींच्या संदर्भात विविधप्रकारचे दावे केले गेले आहेत.
नवी दिल्ली- नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला BoseFiles या वेबसाइटने त्यांच्या मृत्यूसंदर्भात दावा केला आहे. या वेबसाइटने म्हटले आहे की, अखेरच्या वेळी नेताजींच्या गळ्याला कोरड पडूलागली होती आणि ते वारंवार पाण्याची मागणी करत होते.

अखेरचा श्वास घेण्या आधी काय म्हणाले नेताजी...
वेबसाइटने दावा केला आहे की, नेताजींनी अखेरचा श्वास घेण्याआधी, "मी अखेरच्या श्वासापर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिलो. भारतीयांनीदेखील ही स्वातंत्र्याची लढाई अशीच सुरू ठेवावी. हिंदुस्तान निश्चितच स्वतंत्र होणार, भारताला कुणीही गुलाम करुन ठेऊ शकत नाही." असे उद्गार काढले होते. जेव्हा ते हे सर्व बोलत होते, तेव्हा त्यांच्या गळ्याला कोरड पडत होती.

वेबसाइटचा दावा- तैपईमध्ये झाला होता. मृत्यू
18 ऑगस्ट 1945 च्या दुपारी नेताजींचे विमान अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेनंतर कर्नल हबीबुर रहेमान विमानाबाहेर पडले. तेव्हा त्यांच्या शरिराला आग लागलेली होती. त्यांच्यासमोर नेताजी उभे होते. त्यांच्या कपड्यांनीही पेट घेतला होता. हबीबुर रहेमान यांनी त्यांचा कोट तर काढला. मात्र स्वेटर आणि पायातील बूट काढू शकले नाही. परिणामी नेताजी गंभीर भाजले गेले. त्यांना तत्काळ ननमोन मिलिट्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
नर्सने सांगितले, कोमात गेल्यानंतर झाला होता नेताजींचा मृत्यू
नर्स सान पी शा यांनी सांगितले की, उपचारादरम्यान नेताजींना श्वास घेण्यास फार त्रास होत होता. यानंतर त्यांनी डॉक्टर योशीमी यांच्या सांगण्यावरुन नेताजींना कॅमफरचे इंजेक्शन दिले. मात्र यानंतर ते हळू-हळू कोमात गेले. आणि कोमातच त्यांचा मृत्यू झाला.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, BoseFiles नी उघड केलेले काही तथ्य...
- काय म्हणाले शेवटच्या क्षणी सुभाषचंद्र...
-केव्हा घेतला नेताजींनी शेवटचा श्वास...
- काय म्हणाल्या आहेत त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर योशीमी