आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्याच दिवशी इंदिरा गांधींनी लादली होती Emergency, या आहेत कटू आठवणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरोबर 40 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती. त्यामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून मिरवणाऱ्या भारत देशातील लोकांवरच अनेक बंधने लादण्यात आली होती. आपण युद्धात किंवा दंगलीत अनेक देशबांधव गमावले आहेत. पण आणीबाणीच्या त्या 21 महिन्यांच्या काळातील आठवणी या त्यापेक्षाही अधिक वेदनादायी आहेत. आणीबाणीच्या या काळात अनेक निर्बंध लादण्यात आले होते, अनेक प्रकारे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच्याच काही निवडक आणि महत्त्वाच्या आठवणी किंवा घटनांना आपण आज उजाळा देणार आहोत.
माध्यमांची मुस्कटदाबी
माध्यमांवर अनेक निर्बंध याकाळात इंदिरा गांधी सरकारने लादली होती. त्याच्या निषेधार्थ इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने अग्रलेखाचा स्तंभ कोरा ठेवला होता. कोणत्याही माध्यमाने सरकारविरोधात छापू नये. सर्व माध्यमांकडून सरकारची स्तुतीच केली जावी असे निर्देश होते. पण अनेक माध्यमांनी सरकारविरोधी पवित्रा स्वीकारला आणि त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास, मनस्तापही सहन करावा लागला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आणीबाणीच्या इतर काही कटू आठवणी

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.


बातम्या आणखी आहेत...