आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM म्हणाले- \'मुस्लिम मत बाजारातील वस्तू नाही, धर्मनिरपेक्षतेच्या परिभाषेला विकृत केले\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोझीकोडे - मुस्लिमांकडे मतांच्या बाजारातील वस्तू म्हणून पाहू नका, त्यांचा द्वेष करू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. दुसरीकडे ‘मन की बात’ कार्यक्रमात उरी हल्ल्याचा उल्लेख करत दोषींना कदापि सोडणार नाही, असे स्पष्ट केले. लष्कर कधीही बोलत नाही, पराक्रम दाखवते, असा गर्भित इशाराही त्यांनी या वेळी दिला.

कोझीकोडे येथे बोलताना मोदी म्हणाले, पन्नास वर्षांपूर्वी जनसंघाला आणि आता भाजपला ओळखताना लोक चूक करत आहेत. आपल्याकडे धर्मनिरपेक्षतेच्या परिभाषेला विकृत बनवण्यात आले आहे. मुस्लिमांचा तिरस्कार न करता त्यांना चांगल्या भावनेने स्वीकारा, असे दीनदयाल उपाध्याय यांनी म्हटले हाेते.
“सबका साथ सबका विकास’ ही केवळ घोषणा नाही तर आपली बांधिलकी आहे. निवडणुकीतील सुधारणांवरही चर्चेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

लष्करावर पूर्ण विश्वास
‘मन की बात’मध्ये मोदी म्हणाले, हल्लेखोर पाकमधून आले होते. आम्हाला भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास आहे. लष्करातील जवान नेत्यांसारखे बोलत नाहीत. ते करून दाखवतात. दरम्यान, टोल फ्री हेल्पलाइन १९६९ डायल करून स्वच्छता अभियानाबाबत माहिती देण्याचे आवाहन मोदी यांनी या वेळी केले.
नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये कोणकोणत्या मुद्दयांवर जोर दिला हे पाहुयात पुढील स्लाइड्सच्या माध्यमातून..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...