रायपूर - मिस इंडियाच्या टॉप कंटेस्टंटपैकी एक एसलेली टीजे भानुप्रिया हीला नुकतीच कुशाभाऊ ठाकरे जर्नलिझम युनिव्हर्सिटीच्या दुसऱ्या दीक्षांत सोहळ्यात पदवी प्रदान करण्यात आली आहे. भानुप्रियाच्या सौंदर्याचा अंदाज यावरून येऊ शकतो की, युरोपच्या एका फोटोग्राफरने जेव्हा तिला पाहिले, तेव्हा त्याने फारसा विचार न करता लगेचच तिला पुढच्या प्रोजेक्टसाठी साइन केले होते.
असाइनमेंटसाठी गेली होती टूरवर...
- सुमारे वर्षभरापूर्वी भानुप्रिया एका मॉडेलिंग असाइनमेंटसाठी युरोप टूरवर गेली होती.
- त्याठिकाणी एका पार्टीमध्ये युरोपियन फोटोग्राफर अली केपनेक याने तिला पाहिले आणि तिच्या निसर्गदत्त सौंदर्याने तो एवढा प्रभावित झाला की, त्याने तिला लगेचच फोटोशूटची ऑफर दिली.
- त्यानंतर एका दिवसाच्या फोटोशूटमध्ये तिने टीजेचे अनेक फोटो क्लिक केले. त्यानंतर डिसेंबरमध्ये जर्मनीत एका एक्झिबिशनमध्ये ते फोटो डिस्प्ले करण्यात आले.
आरजे म्हणून करिअरची सुरुवात
- रायपूरमध्ये जन्मलेली आणि लहानाची मोठी झालेल्या भानुप्रियाने तिचे करिअर मायएफएम मधून आरजे म्हणून सुरू केले होते.
- व्हॉलीबॉलची नॅशनल प्लेयर राहिलेली भानुप्रिया दुखापतीमुळे पुढे खेळू शकली नाही.
- भानुप्रिया मिस इंडिया 2014 च्या टॉप 24 कंटेस्टंट पैकी एक होती.
- यू-ट्यूबचा फेमस कॉमेडियन कनन गिलसह तिने शादी डॉट कॉमची जाहिरातही केली आहे.
- त्याशिवाय मिंत्रा डॉट कॉम, फॅशन डिझायनर, ऋुतू कुमार यांच्यासाठीही तिने शूट केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, भानुप्रियाचे आणखी काही PHOTOS