आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Netaji Subhash Chandra Bose Wife And Doughter

ही आहे सुभाषबाबूंची पत्नी आणि मुलगी, ऑस्ट्रियामध्ये अशी झाली होती भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुभाषबाबूंची पत्नी एमिली आणि मुलगी अनीता. - Divya Marathi
सुभाषबाबूंची पत्नी एमिली आणि मुलगी अनीता.
नवी दिल्ली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कसा झाला या बद्दल आजही अनेकांच्या मनात संशय कायम आहे. 18 ऑगस्ट 1945 रोजी जपानमध्ये एका विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या निधनाच्या तारखे वरुन इतिहासकारांमध्ये वाद आहेत. मात्र आज 18 ऑगस्ट निमीत्त सुभाष बाबूंबद्दल divyamarathi.com त्यांच्या जीवनासंबंधीत महत्त्वाची माहिती वाचकांना देत आहे. जाणून घेऊ या त्यांची पत्नी एमिली आणि मुलगी अनीता बद्दल.
1934 मध्ये सुभाषबाबू ऑस्ट्रेयामध्ये उपचारांसाठी गेले होते. उपचारादरम्यान त्यांच्याकडे बराच वेळ मोकळा होता. आत्मकथन लिहून त्याचा योग्य उपयोग करता येईल असे सुभाषचंद्र बोस यांना वाटले. त्यासाठी त्यांना गरज होती एका टायपिस्टची. त्यांनी ऑस्ट्रेयाचे त्यांच्या एका मित्राकडे त्याबद्दल विचारणा केली. त्यांच्या मित्राने एमिला शेंकल यांना सुभाषबाबूंकडे पाठवले. सुभाषबाबू त्यांच्या आयुष्याबद्दल डिक्टेट करत होते आणि एमिली या टाइप करत होत्या. या दरम्यान त्यांच्यात एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झाले. 1937 मध्ये त्यांनी लग्न केले. 29 नोव्हेंबर 1942 रोजी व्हिएन्नामध्ये एमिलीने एका मुलीला जन्म दिला. सुभाषबाबूंनी आपल्या मुलीचे नाव अनिता ठेवले. एमिली शेंकल यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1910 मध्ये झाला होता, तर मार्च 1996 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
एमिला यांनी तार ऑफिसमध्ये केली नोकरी
सुभाषचंद्र बोस यांच्या पत्नीला घर चालवण्यासाठी तार ऑफिसमध्ये नोकरी करावी लागली होती. अनीता यांच्या सांगण्यानूसार, एमिली यांनी सुभाषबाबूंसोबतचे त्यांचे संबंध कधीच जगजाहीर केले नाही. आपल्या पतीचे नाव गुप्त ठेवण्यासाठी त्यांनी हे सर्व केले आणि त्यांच्या मृत्यूसोबतच हे गुपित त्यांच्यासोबत गेले. अनीता सांगतात, की माझ्या आईला माझ्या वडीलांच्या मृत्यूची बातमी रेडिओवरुन मिळाली. आई सांगायची - मी नेहमी प्रमाणे सायंकाळी रेडिओच्या बातम्या एकत होते. तेव्हाच सांगितले गेले की भारतातील सुभाषचंद्र बोस यांचा तायपाई मध्ये एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला.
अनीता जर्मनीत होत्या उपमहापौर
जर्मनीतील फॉफ आउग्सबर्ग जिल्ह्यात 15 हजार लोकसंख्या असलेल्या स्टेटबेर्गन शहराच्या अनीता उपमहापौर होत्या. त्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक देखील होत्या. त्या अनेकदा भारतात देखील येऊन गेल्या आहेत. त्यांना तीन मुले आहेत - पेटर अरुण, थॉमस कृष्णा आणि माया करीना. एकदा भारत दौऱ्यावर असताना अनीता यांनी सांगितले, होते की त्या फक्त एक महिन्याच्या होत्या तेव्हा नेताजींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी व्हिएन्ना सोडले होते. जेव्हा नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली तेव्हा अनीता फक्त अडीच वर्षांच्या होत्या.

मार्टीन फॉफ्फसोबत झाला अनीता यांचा विवाह
अनीता आणि मार्टीन फॉफ्फ यांची पहिली भेट बंगळुरुत झाली होती. ऑस्ट्रिया वंशाचे मार्टिन अंधांसाठीच्या एका संस्थेसाठी काम करत होते. काही दिवसांनी ते मायदेशी परतले आणि तिथेच त्यांनी अनीतासोबत विवाह केला. मार्टीन आणि अनीता यांनी पुढे एकत्रच अर्थशास्त्रात पीएचडी केली आणि जर्मनीच्या आउग्सबुर्ग विद्यापीठात प्रोफेसर झाले. मार्टीन जर्मनीच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य होते आणि ते खासदार देखील झाले.
सुभाषबाबूंच्या आईच्या सोन्याच्या बांगड्या अनीता यांच्याकडे
नेताजी सुभाषचंद्रबोस यांच्या मातोश्री प्रभावती देवी यांनी धाकट्या सुनेसाठी सोन्याच्या बांगड्या केल्या होत्या. त्यांनी मृत्यूआधी शरतचंद्र यांची पत्नी विभावती यांच्याकडे त्या आठ बांगड्या सुपूर्द केल्या आणि सुभाषचे लग्न होईल तेव्हा त्याच्या पत्नीला त्या दे असे सांगितले होते. शरतचंद्र व्हिएन्नाला गेले तेव्हा त्यांनी आठवणीने त्या बांगड्या एमिली यांना दिल्या होत्या. अनीता यांनी अजूनही त्या बांगड्या सांभाळून ठेवल्या आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सुभाषचंद्र बोस यांची निवडक छायाचित्रे