आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूत शिकलेल्या निर्मला सीतारमण लंडनमध्ये हाेत्या सेल्सगर्ल; आता देशाच्या संरक्षणमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेएनयूच्या विद्यार्थिनी निर्मला यांनी लंडनमध्ये सेल्सगर्ल म्हणून काम केले... - Divya Marathi
जेएनयूच्या विद्यार्थिनी निर्मला यांनी लंडनमध्ये सेल्सगर्ल म्हणून काम केले...
नवी दिल्ली- नरेंद्र माेदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वात धक्कादायक नाव अाहे निर्मला सीतारमण यांचे. कारण त्या देशाच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री बनल्या अाहेत; परंतु त्यांची चर्चा केवळ याच कारणामुळे नाही. त्यांची पदाेन्नती भाजपचे तामिळनाडूत थेट प्रवेशाचे प्रयत्न व पक्षात त्यांच्या वाढत्या स्थानाचे संकेत अाहेत. अाता त्या पक्षाच्या फायरब्रँड सुषमा स्वराज, उमा भारती व स्मृती इराणी यांना मागे टाकत सर्वात शक्तिशाली महिला मंत्री बनल्या अाहेत.

निर्मला यांचे वडील रेल्वेत हाेते. त्यांची वारंवार बदली हाेत हाेती. त्यामुळे त्यांनी शालेय जीवनातच तामिळनाडूचा माेठा भाग पाहिला. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेऊन त्या दिल्लीत अाल्या. तेथे त्यांनी जेएनयूत प्रवेश घेऊन टेक्सटाइल अभ्यासक्रमात एम. फिल. केले. याचदरम्यान विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी त्या मुक्त विचारवंतांशी जाेडल्या गेल्या. येथेच त्यांची भेट अांध्रचे परकल प्रभाकर यांच्याशी झाली. दाेघांनी १९८६ मध्ये लग्न केले. त्यानंतर दाेघे ब्रिटनला गेले. प्रभाकर लंडन स्कूल अाॅफ इकाॅनाॅमिक्समधून पीएच.डी करत हाेते, तेव्हा निर्मला हॅबिटेट कंपनीत सेल्सगर्ल हाेत्या. मात्र, लवकरच त्यांनी ही नाेकरी साेडली आणि  प्राइस वाॅटर हाऊस कूपर्स कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक (संशाेधन व विश्लेेषण) म्हणून रुजू झाल्या.१९९१ मध्ये दाेघेही भारतात परतलेआणि हैदराबादेत स्थायिक झाले. त्या शिक्षण क्षेत्रात काम करू लागल्या. २००३ ते २००५ पर्यंत त्यांनी राष्ट्रीय महिला अायाेगाच्या सदस्या म्हणून काम पाहिले, तर २००६ मध्ये त्या राजकारणात अाल्या. त्यांचे सासू-सासरे दाेघेही काँग्रेसचे अामदार हाेते. सासरे मंत्रीही हाेते; परंतु निर्मला काँग्रेसएेवजी भाजपमध्ये गेल्या. पुढील वर्षी त्यांचे पती प्रभाकर हे चिरंजीवी यांच्या प्रजाराज्यम पक्षात गेले; परंतु लवकरच हा पक्ष साेडून तेही भाजपमध्ये दाखल झाले. सध्या ते अांध्र प्रदेशात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे संवाद सल्लागार अाहेत.  

पुढील स्लाइड्सवर वाचा, निर्मला यांच्या आयुष्याविषयी सविस्तर...
 
बातम्या आणखी आहेत...