आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्भया बलात्कार: वाचा... \'त्या\' रात्री काय घडले होते तिच्यासोबत, अल्पवयीन क्रूरकर्म्यांची हेलावणारी कृत्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरा देणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. 16 डिसेंबर 2012 च्या रात्री निर्भयावर जो अत्याचार झाला त्यामुळे जगभरात धक्का बसला आहे, असे वाटते की ही परग्रहावरीचीच घटना आहे. अशा गुन्हेगारांना माफी किंवा दया दाखवण्याची कायद्यात तरतूदच नाही, असे मत निकाल जाहीर करताना न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी नोंदवले तर न्यायमूर्ती आर. भानुमती यांनी सामाजिक सुधारणांचा विशेष उल्लेख करून वेगळा निकाल दिला आहे.

या प्रकरणात एकूण 6 आरोपी होते. एकाने तुरुंगातच आत्महत्या केली तर एक अल्पवयीन होता. 3 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर त्याची सुटका झाली. उर्वरित चौघे, मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर तिहार तुरुंगात आहेत. 

बाल गुन्हेगारी कायद्यातील त्रुटींमुळे अल्पवयीन आरोपी मुक्त झाला आहे. त्याला शिक्षा व्हावी म्हणून विविध सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. गुन्ह्याच्या वेळी गुन्हेगार अल्पवयीन असल्याचा फायदा उचलत त्याला सोडवण्यात बचावपक्षाला यश आले. पण देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात संताप आणणारी ही घटना एवढी क्रूर होती की, नागरिकांमध्ये अजूनही या निर्णयाबाबत संताप व्यक्त होत आहे.
16 डिसेंबर 2012 च्या रात्री ही घटना घडली. त्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. केवळ सामुहिक बलात्कारापर्यंत न राहता या घटनेमध्ये गुन्हेगारांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्याने नंतर झालेल्या तपासावरून आणि वैद्यकीय अहवालावरून समोर आले होते.
त्या रात्री नेमके काय घडले...या क्रूरकर्म्यांनी कशा प्रकारे निर्भयाच्या सुंदर आयुष्यामध्ये कायमचा काळोख आणला, हे आम्ही याठिकाणी देत आहोत. याबरोबरच सुटका झालेला जो अल्पवयीन गुन्हेगार आहे, त्याच्या घरची सद्यस्थितीही आम्ही या माध्यमातून देणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा...
> त्या रात्रीची संपूर्ण कथा...
> बलात्काऱ्यांनी केला क्रौर्याचा कळस...
> अल्पवयीन गुन्हेगाराच्या घरची स्थिती...
> बहिणीच्या दुपट्ट्याचे बनवले पडदे...
> भाऊ म्हणाला, तो माझ्यासारखा दिसायला नको...
घराला दारेही नाहीत...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...