आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरमेहरच्या या Video वरुन चिघळलाय वाद, तिने मांडल्या होत्या स्वतःच्या वेदना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभाविपच्या विरोधातील पोस्टरसह फोटो पोस्ट केल्यानंतर गुरमेहर कौर ही तरुणी टीकाकारांचे लक्ष्य ठरत आहे. त्यात सेहवागसारख्या क्रीडापटुंनी तिच्याबाबत केलेल्या पोस्टनंतर तर हे प्रकरण अधिकच चिघळायला लागले आहे. पण गुरमेहर हिने जवळपास वर्षभरापूर्वी एका व्हिडीओच्या माध्यमातून एक संदेश देत तिची कहाणी वर्णन केली होती. त्यातून तिने वयाच्या दुसऱ्या वर्षी वडिलांना गमावल्याच्या वेदना मांडल्या होत्या. त्याचवेळी दोन्ही देशांनी शांतता बाळगल्याशिवाय माझ्यासारख्या गुरमेहर वडिलांच्या प्रेमाला मुकतच राहतील, असेही तिने या व्हिडीओद्वारे सांगितले होते. तिच्या या व्हिडीओतील एक स्लाइडवरूनच सध्या गोंधळ सुरू आहे. पण या सगळ्या स्लाइड्सच्या माध्यमातून तिने सांगितलेली नेमकी स्टोरी काय होती हे आपण या पॅकेजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 
 
गुरमेहरचे वय अवघे दोन वर्षे होते, त्यावेळी कारगिल युद्धात तिने वडील गमावले. याचा गुरमेहरच्या मनावर खोलवर परिणाम झाला. एवढा की ती पाकिस्तान आणि सर्व पाकिस्तानी नागरिकांचा तिरस्कार करू लागली. हा तिरस्कार दिवसेंदिवस वाढत गेला. त्यानंतर पुढे काय झाले हे गुरमेहरने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. एकही शब्द न बोलता केवळ कागदांवर लिहिलेल्या काही अक्षरांच्या माध्यमातून गुरमेहरने तिच्या मनातील भावना मांडतानाच युद्धाचा परिणाम किती गंभीर असतो हे सांगितले आहे, त्याचबरोबर संदेश द्यायलाही ती विसरली नाही.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, गुरमेहरने मांडलेल्या भावना, अखेरच्या स्लाइडवर पाहा व्हिडीओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...