आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडीतून निघाली लग्नाची वरात, हिमालयातून परतल्यानंतर एकच दिवस थांबले घरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नरेंद्र मोदींचा फाइल फोटो)

वडनगर (गुजरात) - त्यावेळी मोदींचे वय 12 वर्ष होते. ते कुटुंबाबरोबर महेसाणा जिल्ह्याच्या वडनगरमध्ये राहत होते. त्यावेळी एक साधू वडनगरला आले होते. मोदींच्या आई हीराबा यांच्याकडे त्यांनी मोदींची कुंडली मागितली होती. हिराबांनी मोदींसह त्यांचे मोठे भाऊ सोमभाई यांचीही कुंडली दाखवली. त्यावर सोमभाईंची कुंडली पाहून साधू म्हणाले याचे जीवन तर सर्वसामान्य असेल, पण त्याला तुरुंगात जावे लागेल. पण तुमच्या लहान मुलाचे जीवन चढ उतारांनी भरलेले असेल. याच्या कुंडलीत असा योग आहे की, हा एक दिवस राजा बनेल किंवा एका महान संताप्रमाणे सिद्धी मिळवेल.
या दरम्यान मोदींची धार्मिक ओढ वाढली. ते बहुतांश वेळ पुजा-अर्चना करू लागले. त्यामुळे ते खरंच साधू बनतात की काय? अशी चिंता कुटुंबीयांना होऊ लागली. सगळ्यांनी मोदींना समजावले, पण त्यांच्या डोक्यातून साधू बनण्याचा विचार निघतच नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा विवाह लावून देण्याचे ठरवले. लग्नानंतर संसाराच्या रहाटगाड्यात व्यस्त झाल्यानंतर साधू बनण्याचा विसर पडेल असे कुटुंबीयांना वाटले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी घाईत जशोदाबेन यांची निवड केली आणि मोदींचे लग्नही लावून दिले. त्यावेळी अशा लहान मोठ्या निर्णयात मोठ्यांना विरोध केला जात नव्हता.
पुढे वाचा, आईला म्हणाले, मला हिमालयावर जायचेय...