आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधींच्या अंत्यसंस्कारावेळी बेनजीर आणि आराफात यांना कोसळले होते रडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेनजील भुट्टो, राजीव गांधी आणि यासेर आराफात. - Divya Marathi
बेनजील भुट्टो, राजीव गांधी आणि यासेर आराफात.
नवी दिल्ली - देशातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (20 ऑगस्ट) 71 वी जयंती आहे. यानिमीत्ताने divyamarathi.com त्यांच्याबद्दलची ज्ञात-अज्ञात माहिती वाचकांना सांगत आहे. या मालिकेत सांगत आहोत, राजीव गांधींच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी दिल्लीतील शक्तिस्थळ येथे पॅलिस्टिनी नेते यासिर आराफात आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांना अश्रू अनावर झाले होते.
21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदूर येथे राजीव गांधी यांची मानवी बॉम्बने हत्या करण्यात आली होती. छिन्नविछिन्न झालेल्या त्यांच्या पार्थिवावर 24 मे रोजी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्या दिवशी दिल्लीसह संपूर्ण देशात एक वेगळीच शांतता पसरली होती. राजीव गांधींच्या अंत्यसंस्कारेच दुरदर्शनवरुन थेट प्रसारण सुरु होते. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते. सायंकाळी सव्वा पाच वाजता राहुल गांधी मुखाग्नी देतील अशी तयारी झाली होती. सोनिया गांधी, राजीव गांधींचे जवळचे मित्र अमिताभ बच्चन आणि प्रियंका सोबत उभे होते. वाराणसीहून आलेले पंडित गणपत राय मंत्रपठण करत होते.
राहुल गांधींनी दिला मुखाग्नी आणि आराफात व बेनजीर यांना कोसळले रडू
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, पॅलिस्टिनी नेते यासिर आराफात, पंतप्रधान नवाज शरीफ, बांगलादेशच्या तत्कालिन पंतप्रधान बेगम खालिदा जिया त्यावेळी उपस्थित होत्या. सर्वांच्याच चेहऱ्यावर दुःखाचे भाव होते. राहुल यांनी ज्या क्षणी पार्थिवाला मुखाग्नी दिला तेव्हा आराफात आणि बेनजीर यांना आश्रू अनावर झाले आणि ते रडू लागले. त्यांच्या माना खाली झुकल्या. शक्तिस्थळ येथे जवळपास दोन तास अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरु होता. या दरम्यान कित्येकदा उपस्थित नेत्यांचे डोळे भरून आले. आराफात यांनी त्यांच्या डोक्याला बांधलेल्या कपड्याने तर बेनजीर यांनी ओढणीने डोळे पुसले. राजीव आणि बेनजीर यांच्यात चांगलीच केमेस्ट्री होती, दोघेही आपापल्या देशाचे पंतप्रधान असतांना दोन्ही देशांचे संबंधही चांगले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी फोटोज्..