आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरी चप्पल घालूनच संजय गांधी उडवायचे विमान, अपघातात झाला होता मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
संजय गांधी भारतीय राजकारणातील अत्यंत लोकप्रिय नेत्यांपैकी एक होते. 1974 च्या आसपास आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे संजय गांधी हे 1977-78 च्या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. काँग्रेसमध्ये त्यांना इंदिरा गांधींनंतर पक्षाचा चेहरा मानले जात होते. पण त्यांच्या अवेळी झालेल्या मृत्यूमुळे देशाला आणि भारतीय राजकारणाला मोठा धक्का बसला.

संजय गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. 23 जून, 1980 मध्ये एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. संजय गांधींना वेगाने गाडी आणि विमान चालवणे आवडत होते. पण त्याच छंदाने त्यांचे प्राण हिरावले असे म्हटले जाते. राजकीय अभ्यासक विनोद मेहता यांच्या द संजय स्टोरी या पुस्तकामध्ये संजय गांधींबाबत अनेक किस्से सांगण्यात आले आहे. त्यात त्यांच्या मृत्यूबाबत उल्लेख करताना संजय गांधी हे कोल्हापुरी चपला घालून विमान उडवायचे असेही त्यांनी सांगितले होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, विनोद मेहता यांच्या पुस्तकातील संजय गांधी यांच्या बाबतचे काही किस्से..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...