आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांची मोदी भेट अन् जानकरांच्या वक्तव्यावर कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रात मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी जाेर वाढला असून लाखाेंच्या माेर्चांमुळे सरकारबराेबरच विराेधी पक्षांवरही दबाव वाढत चालला अाहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी सायंकाळी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेतली. दरम्यान, महादेव जानकरांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असले, तरी शरद पवारांनी कार्यकत्यांना शांत राहण्याचे आवाहन फेसबूकच्या माध्यमातून केले आहे.
(फेसबूक पोस्टमध्ये पवारांनी काय म्हटले ते वाचा, पुढील स्लाइड्सवर..)
‘महाराष्ट्रात मराठा समाजाला, खासकरून शेती करणाऱ्या समाजबांधवांना अारक्षणाची गरज अाहे. त्यामुळे केंद्र राज्याच्या समन्वयातून हा विषय प्राधान्याने चर्चेला घ्यावा. तसेच संसदेत या विषयावर चर्चा व्हावी यासाठी अापण स्वत: पुढाकार घ्यावा,’ असे साकडे पवारांनी पंतप्रधानांना घातले. मराठा समाजालाअारक्षण देताना इतर समाजाच्या अारक्षणाला जराही धक्का लागणार नाही याची काळजीही घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली.
या भेटीत पवारांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीतील साखर कारखान्यांचा मुद्दाही माेदींच्या कानी घातला. ‘साखरेसंदर्भात राज्य केंद्र सरकार घेत असलेल्या निर्णयाचा ऊस उत्पादकांना फटका बसत असून त्यांना हमी भाव मिळण्यात अडचणी येत अाहेत. त्यामुळे सरकारने या धाेरणाचा फेरविचार करावा,’ अशी मागणीही पवारांनी केली. राज्यातील अार्थिक अडचणीत अालेल्या साखर कारखान्यांना मदत करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. अनेक साखर कारखाने इथेनाॅल, वीज उत्पादन यासारखी पूरक उत्पादने घेत अाहेत. त्यामुळे सरकारने इथेनाॅल धाेरणात बदल करावा, जेणेकरून त्या माध्यमातून कारखान्यांना अधिक उत्पन्न मिळू शकेल, त्यांची अार्थिक परिस्थिती सुधारू शकेल याकडे पवारांनी माेदींचे लक्ष वेधले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, भगवानगडावरील भाषणांबाबत पवारांनी केलेली फेसबूक पोस्ट..
बातम्या आणखी आहेत...