आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Terrorist Attacks In Punjab In Last 15 Year

Punjab Attack : यापूर्वीही दहशतवाद्यांनी अनेकदा हादरवले आहे पंजाब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पंजाबच्या पठाणकोटमध्ये शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर सुमारे तीन दिवस झाले तरी अजूनही पठाणकोठमधील एअर फोर्स बेसमध्ये सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. सुरक्षा संस्था किंवा प्रशासनानेही अद्याप सर्व काही ठीक झाले असल्याचे स्पष्टपणे सांगितलेले नाही. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत पंजाबमध्ये झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. पण गेल्या काही वर्षांतच नव्हे तर नेहमीच पंजाब दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलेला आहे. 2001 पासून ते अगदी पठाकोट हल्ल्यापर्यंत पंजाबमध्ये झालेल्या काही दहशतवादी हल्ल्यांची माहिती या निमित्ताने आम्ही देत आहोत. यात काही लहान घटनांचा समावेश करण्यात आलेला नाही.

1 मार्च 2001
1 मार्च 2001 रोजी पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये सुरक्षा रक्षकांना भारत पाकिस्तानच्या सीमेवर एक सुरुंग खोदलेला असल्याचे लक्षात आले होते. हा सुरुंग सुमारे 135 यार्ड लांबीचा होता. दहशतवाद्यांनी भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्यासाठी हा सुरुंग खोदला अशल्याची शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, यापूर्वी झालेले काही महत्त्वाचे दहशतवादी हल्ले...