आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलंदशहर : बलात्कारानंतर टाळ्या, 50 गँगरेप.. संपूर्ण कहाणी वाचून अंगावर येईल काटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बुलंदशहरच्या हायवेवर झालेल्या गँगरेप प्रकरणातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या घटनेत सहभागी असलेले नराधम यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये सहभागी होती. यापूर्वी 50 हून अधिक गँगरेप आणि दरोड्याच्या गुन्ह्यात त्यांचा समावेश असल्याची माहितीही समोर येत आहे. पाच राज्यांचे पोलिस विविध गुन्ह्यांप्रकरणी या आरोपींचा शोध घेत होते.

गँगरेप प्रकरणानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली होती. तरुणी आणि तिच्या आईवर कुटुंबीयांसमोर झालेल्या गँगरेपनंतर वेगवान हालचाली झाल्या आणि आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली आणि त्यांच्या कबुलीनंतर समोर आलेले सत्य ऐकूण पोलिसही हादरले. ज्या आरोपींना गँगरेप प्रकरणात अटक केली आहे ते एवढे मोठे आरोपी असतील अशी शक्यताच पोलिसांना वाटली नव्हती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी बुलंदशहर प्रमाणेच विविध भागांमध्ये अशा प्रकारचे कुकर्म केलेले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी सलीम बावरिया याने त्यांच्या यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांबाबत माहिती दिली आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, कसे चालायचे टोळीचे काम.. कोणत्या घटनांची दिली कबुली.. कशी घडली होती बुलंदशहरची घटना.. क्रूरकर्म्यांनी केला तरुणी आणि तिच्या आईवर बलात्कार..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...