आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या मदतीने हाेणार मुळा-मुठा नदीचे शुद्धीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुण्यातील मुळा व मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’ (जायका) या कंपनीशी बुधवारी सामंजस्य करार केला.
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व जपानचे राजदूत केंजी हिरामत्सु यांनी या करारावर सह्या केल्या. देशातील प्रदूषित ३०२ नद्यांमधे मुळा-मुठा या नद्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेअंतर्गत (एनआरसीपी) या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रस्ताव पाठवला होता. अाता या करारानुसार दाेन्ही नद्यांच्या शुद्धीकरणासाठी जायका कंपनी एक हजार कोटींचे कर्ज देणार आहे. ते ४० वर्षांत फेडावे लागणार अाहे. तसेच नद्यांमध्ये ११ नवीन मल-जल शोधन यंत्र बसवले जाणार अाहे, त्यामुळे जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होईल. या नद्यांच्या शुद्धीकरणावर ९९०.२६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पैकी केंद्र सरकारचा वाटा ८४१.७२ कोटी आणि पुणे महापालिकेचा वाटा १४८.५४ कोटींचा असेल. ही शुद्धीकरण योजना जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे करारात नमूद अाहे.