आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#SelfieWithDaughter : लेकीविना फाेटाे, ती कसली सेल्फी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी ‘बेटी बचाओ, सेल्फी बनाओ’ ला मोहीम करण्याची कल्पना मांडली. मोहिमेची सुरुवात करणाऱ्या सरपंचाने भास्करला सांगितली या विचारामागील कहाणी.

जनतेसोबत ‘मन की बात’ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ‘सेल्फी विथ डॉटर’ बाबत बोलले. ते म्हणाले ‘तुम्ही मुलीसोबत छायाचित्र घेऊन #SelfieWithDaughter लिहून शेअर करा. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ला बळ देणारी टॅगलाइनही लिहा. प्रेरक टॅगलाइन मी रिट्विट करेन. जिंद (हरियाणा) जिल्ह्यातील बीबीपूर गावचे सरपंच सुनील जागलान यांनी या मोहिमेची सुरुवात केली. सुनील जागलान यांनी या विचारामागील कहाणी सांगितली...

याच महिन्यातील घटना. टीव्ही चॅनल्सवर पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांना सेल्फी घेताना पाहिले. काही वेळानंतर फेसबुक, ट्विटरवर तो फोटो ट्रेंड करत होता. इतरही काही सेल्फीज सोशल मीडियावर सुरू होत्या. बस, तेथूनच ही आयडिया क्लिक झाली. लोकांना सेल्फी घेण्याचा खूप छंद आहे. मुलींच्या सन्मानाशी त्याची जोड का देऊ नये?

सेल्फी असावी तर बस, मुलीसोबतच.. मुलीशिवाय असलेली सेल्फी उपयोगी नाही, असे वेड संपूर्ण देशात निर्माण व्हावे,अशी माझी इच्छा होती.

मला दोन मुली आहेत. प्रत्येक वडील, प्रत्येक आई, कुटुंबीयाला ती किती आवडते याची माहिती देशभरातील मुलींनाही व्हावी असा निश्चय मी केला. हे सांगण्याचे इतरही मार्ग होते. पण सेल्फी सर्वांत सोपा मार्ग होता. या विचारासोबतच स्पर्धेचाही विचार आला. मोहिमेचे नाव निश्चित करण्यासाठी मला जास्त वेळ लागला नाही. एकदम क्लिक व्हावा, असे नाव मला द्यायचे होते. एवढ्या सेल्फी येतील, असे सुरुवातीला वाटले नव्हते. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून व्हॉट्सअॅपवर हजारो सेल्फी आल्या होत्या. मुलींसोबतच्या सेल्फी एवढ्या चांगल्या होत्या की विजेत्याची निवड करणे कठीण होते. तरी १९ जूनला तिघांना विजेता घोषित करण्यात आले. ज्यांना मुली नव्हत्या अशा लोकांचेही मेसेज आले. त्यांनी लिहिले - आम्हाला मुलगी नाही आणि त्याचे आम्हाला सर्वात जास्त दु:ख आहे. लोक आपल्या मुलीला सन्मान देण्यासाठी कुठलीही कसूर ठेवत नाहीत, हे तर यावरून अगदी स्पष्ट झाले. १९ जूनला विजेत्यांना सन्मानित करण्याचा तो क्षण आठवणीत राहणाराच होता. माझ्या गावातील महिलांनी एक गीत गायले. त्याचे शब्द होते-

गंगा नहाओ या मंदिर-मस्जिद जाओ पर बेटियों के प्रति प्यार मत भुलाओ। अब बदल गया है जमाना, बेटियों के संग सेल्फी बनाओ।

महिलांनी या गीताद्वारे फक्त हरियाणालाच नव्हे तर संपूर्ण देशातील लोकांनाच मुलींना समाजात सन्मान देण्याचा संदेश दिला. आता आम्ही प्रत्येक वर्षी १९ जूनला असा कार्यक्रम आयोजित करू. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ही मोहीम आता महाअभियान ठरेल, अशी
अपेक्षा आहे.
(सुरेंद्र भारद्वाज यांना सांगितल्यानुसार)
हे तेच गाव आहे...
- १९ जून २०१२ ला पहिल्यांदा स्त्री भ्रूणहत्येवर पहिल्यांदा येथेच ग्रामसभा झाली होती.
- १४ जुलै २०१२ ला स्री भ्रूणहत्येविरोधात पहिली खाप पंचायतही येथेच झाली.
- २०१२ मध्येच पंचायतीने मुलीच्या आईच्या हस्ते तिरंगा फडकवण्याची परंपरा सुरू केली.
- जिथे स्वागतद्वारात येणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो,असे पहिलेच गाव.
- गावाच्या मुख्य मार्गाचे नाव लाडो, तलावाचे नाव लाडो सरोवर असे येथेच ठेवण्यात आले.
- गावात गर्भवतींची दाेन महिन्यांनी नाेंदणी हाेते. महिलांचीच एक देखरेख समिती अाहे.
पण ३ वर्षांपूर्वी
स्त्री भ्रूणहत्येसाठी कुख्यात. १००० मुलांमागे ५६९ मुली. आता १००० मुलांमागे ८७९ मुली.
बातम्या आणखी आहेत...