आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यतिथी : संजय-मनेका यांची लव्हस्टोरी, प्रेमानंतर वर्षभरात झाले लग्न, Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय गांधी भारतीय राजकारणातील अत्यंत लोकप्रिय नेत्यांपैकी एक होते. 1974 च्या आसपास आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे संजय गांधी हे 1977-78 च्या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. काँग्रेसमध्ये त्यांना इंदिरा गांधींनंतर पक्षाचा चेहरा मानले जात होते. त्याचे कारण म्हणजे राजीव गांधींना राजकारणात काहीही रस नव्हता. पण त्यांच्या अवेळी झालेल्या मृत्यूमुळे देशाला आणि भारतीय राजकारणाला मोठा धक्का बसला.
आज संजय गांधी यांची 24 वी पुण्यतिथी आहे. 23 जून, 1980 मध्ये एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. संजय गांधींना वेगाने गाडी आणि विमान चालवणे आवडत होते.
पहिल्याच भेटीत आवडल्या होत्या मेनका
- संजय गांधींच्या मॉडेल असलेल्या मनेका त्यांना पहिल्या भेटीतच आवडल्या होत्या.
- वयाच्या अवघ्या 17 व्या व र्षी मनेका यांना मॉडेलिंगमध्ये ब्रेक मिळाला होता. बॉम्बे डाइंगच्या एका जाहिरातीसाठी त्यांनी शुटिंग केले होते.
- ही जाहिरात पाहताच संजय गांधी यांचे त्यांच्यावर प्रेम जडले होते.
- संजय गांधी आणि मनेका यांचे भाऊ वीनू कपूर हे मित्र होते, असे सांगितले जाते. वीनू च्या लग्नाच्या पार्टीतच संजय आणि मनेका यांची पहिली भेट (1973) झाली होती.
- मेनका यांच्या आईला मात्र या दोघांचा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी मनेका यांना त्यांच्या आजीच्या घरी पाठवले.
- जुलै, 1974 मध्ये मनेका घरी परतल्या आणि एका महिन्यानंतर त्यांचा संजय यांच्याशी साखरपुडा झाला होता.
देशातील पावर-कपल
- एका महिन्यातच संजय आणि मनेका यांच्या प्रेमाचे रुपांतर विवाहामध्ये झाले होते.
- शीख कुटुंबात जन्मलेल्या 18 वर्षांच्या मनेका (26 अगस्त, 1956) यांच्याशी संजय गांधींनी 23 सप्टेंबर, 1974 मध्ये विवाह केला होता.
- लग्नाच्या वेळी संजय मनेका यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे होते. संजय यांच्याशी विवाहानंतर मनेका यांनी त्यांची बॉम्बे डाइंगची जाहिरात नष्ट केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
- त्याकाळातील राजकीय इतिहास तज्ज्ञांच्या मते त्यावेळी संजय आणि मनेका देशातील राजकारणात एख पावर कपल म्हणून समोर आले होते.
- लग्नानंतर मनेका अनेकदा संजय यांच्याबरोबर दौ-यांवर जात होत्या. संजय गांधी आणि काँग्रेस पक्षाला मजबुती देण्यासाठी त्यांनी सूर्या नावाचे एक मासिकही सुरू केले होते.

मृत्यूने वाढले मतभेद
संजय गांधींना विमान चालवण्याचा छंद होता. तेच त्यांच्या मृत्यूचे कारणही बनले. दिल्लीत झालेल्या एका विमान अपघातात डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. संजय यांच्या मृत्यूच्या अनेक तासांनंतर मनेका यांना ही बातमी देण्यात आली होती. या दुर्घटनेच्या वेळी वरुण गांधी (संजय व मनेका यांचे पुत्र) हे केवळ 3 महिन्यांचे होते. संजय यांच्या मृत्यूनंतर इंदिरा आणि मनेका गांधी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर 1981 मध्ये मेनका ते घर आणि संपत्ती कायमची सोडून बाहेर पडल्या होत्या.
गांधी कुटुंबामध्ये असलेले मतभेद जगजाहीर आहेत. आजही सोनिया आणि मनेका गांधी एकमेकांशी बोलतही नाहीत. एकाच कुटुंबातील असले तरी, राहुल-प्रियंका आणि वरुण गांधी कधीही एकमेकांबरोबर दिसून आले नाहीत. संजय यांच्या मृत्यूनंतर गांधी कुटुंब पूर्णपणे विखुरले गेले.
संजय आणि मनेका यांना केवळ 6 वर्षे वैवाहिक जीवनाचे सुख मिळाले. यादरम्यान अनेकदा ते सोबत असायचे. पुढील स्लाइड्सवर पाहा संजय गांधी यांचे मनेका आणि कुटुंबाबरोबरचे काही PICS...
सर्व फोटो संग्रहित...