आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांनी केला होता सत्ता बळकावण्याचा प्रयत्न\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - चार वर्षांपूर्वी भूदलाची एक तुकडी केंद्र सरकारच्‍या विरोधात चाल करून दिल्‍लीकडे निघाली होती, असा गौप्‍यस्‍फोट कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला. त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍यामुळे सध्‍याचे केंद्रीय मंत्री आणि सैन्‍याचे माजी प्रमुख असेलेल्‍या व्‍ही. के. सिंग यांच्‍या अडचणीमध्‍ये वाढ होऊ शकते. वर्ष 2012 मध्‍ये सरकार आणि व्‍ही. के. सिंग यांच्‍यात वाद सुरू होता. त्‍यावेळी हा प्रकार घडला होता.
वर्ष 2012 मध्‍ये आले होते वृत्‍त, काय आहे प्रकरण...
- या बाबत इंडियन एक्‍स्‍प्रेस या वृत्‍तपत्रात 4 एप्रिल 2014 रोजी बातमी आली होती.
- त्‍याच वर्षी 1 जानेवारीमध्‍ये आर्मीच्‍या दोन तुकड्या दिल्‍लीकडे कूच करत होत्‍या, असा दावा या वृत्‍तात करण्‍यात आला होता.
- यूपीए-2 सरकारच्या विरोधात लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी 16 जानेवारी 2012 रोजी निवृत्तीवयाच्या मुद्द्यावरून सर्वोच्‍च न्यायालयात सरकारच्या विरोधात धाव घेतली होती.
- त्याच दिवशी रात्री हरियाणातील हिस्सार येथून भूदलाची एक सशस्त्र तुकडी रशियन बनावटीची काही चिलखती वाहने व 48 रणगाड्यांसह 150 कि.मी. अंतरावरील दिल्लीकडे प्रयाण करत होती.
- त्याच वेळी आग्रा येथून 50 पॅरा ब्रिगेड ही लष्कराची दुसरी तुकडीही दिल्लीकडे रवाना होत होती. या दोन्ही तुकड्यांच्या हालचालींची कोणतीही माहिती संरक्षण मंत्रालयाला अथवा पंतप्रधानांना देण्यात आली नव्हती हे विशेष.
-लष्कराच्या तुकड्यांच्या हालचालींची खबर गुप्तचर खात्याला कळल्यानंतर तत्काळ सरकारला सतर्क करण्यात आले.
- यानंतर वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या. संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.
- दिल्लीला जोडणा-या सर्व महामार्गांवर अतिदक्षतेचे आदेश देऊन वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली.
- मलेशियाच्या दौ-यावर असलेले संरक्षण सचिव शशिकांत शर्मा यांना तातडीने मायदेशी बोलवण्यात आले. ते 16 जानेवारीच्या मध्यरात्री दिल्लीत पोहोचले.
- त्यांनी कार्यालयात गेल्यानंतर जनरल मिलिटरी ऑपरेशनचे महासंचालक लेफ्ट. जनरल ए. के. चौधरी यांना त्वरित बोलावून परिस्थितीची माहिती घेतली. या माहितीप्रमाणे चौधरी यांनी लष्कराच्या या रूटीन हालचाली असल्याचे सांगितले.
- पण, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संरक्षण मंत्रालयाने लष्कराच्या या दोन तुकड्यांना तातडीने माघारी जाण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर ए. के. चौधरी यांच्याकडून या सर्व घटनेचा लेखाजोखा घेण्यात आला.
- पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना 17 जानेवारीला सकाळी या घटनेची माहिती देण्यात आली.

पुढील स्‍लाइडवर वाचा, लष्‍कराने काय स्‍पष्‍ट‍िकरण दिले होते....
बातम्या आणखी आहेत...