आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातगाडीवरचे पदार्थ उच्च्भ्रू हॉटेलात, ‘चना मसाला’ ते ‘आलू चाट’ची हायक्लास मेनूत खमंग एंट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एरवी रस्त्यावरील पदार्थ म्हणून दुय्यम लेखल्या जाणार्‍या ‘चना मसाला’, ‘आलू चाट’ने उच्चभ्रू हॉटेलच्या मेनूत खमंग एन्ट्री घेतली आहे. हे चटकदार पदार्थ आता पंचतारांकित हॉटेलांमध्ये सर्रासपणे सर्व्ह केले जात असून पर्यटकांचीही त्यांला चांगली दाद मिळू लागली आहे.
दिल्लीतील पारंपरिक पदार्थ म्हणून चना मसाला, आलू चाट, तंदुरी डिशेसची ओळख आहे. परंतु राजधानीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मात्र अलीकडे इटालियन, आशिया, अमेरिकन आणि कॉन्टिनेंटल पदार्थांसोबत या चटकदार आणि खमंग अस्सल देशी पदार्थांना मेनूत सन्मानाने स्थान देण्यात आले आहे. परदेशी पर्यटकांना रस्त्यावर हा पदार्थ अनेक वेळा खाता येत नाही. त्या वेळी असे पर्यटक हमखास पंचतारांकित हॉटेलमध्ये अशा प्रकारच्या पदार्थांची मागणी करू लागतात. ताज मानसिंग, द इम्पेरिअल हॉटेलांमध्ये हे पदार्थ मिळू लागले आहेत.

याही झाल्यात डिश
चाट प्लाटर, तंदुरी टिक्का, तंदुरी कबाब, व्हेज कबाब, चिकन टिक्का. त्याशिवाय इटली, चिनी, इंडोनेशियातील रस्त्यावर तयार करण्यात येणार्‍या खाद्य पदार्थांनीदेखील हॉटेलांच्या मेनूत स्थान मिळवले आहे. हे पदार्थ खवय्यांना आकर्षित करू लागले आहेत.
रस्त्यावरील पदार्थ प्रेरणा
रस्त्यावरील चटपटीत पदार्थांची चव माझ्या कुकिंग स्टाइलला नेहमीच प्रेरणा देणारी ठरली आहे. परंतु हॉटेलमध्ये तशा प्रकारची चव आणणे मला माझ्या पातळीवर कठीण वाटते. मला रस्त्यावर मिळते तशी ‘गोलगप्पा पानी’ करायची म्हटल्यानंतरही करता येणार नाही. - विकास खन्ना, मास्टरशेफ.
ढाब्यावरील पदार्थही
महामार्गांलगतच्या ढाब्यांवर मिळणार्‍या पदार्थांनादेखील पंचतारांकित हॉटेलांमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. तंदुरी कबाब, बाल्टी मीट, वांग्याचे भरीत अशा विशेष थाळींची पर्यटकांकडून ऑर्डर होऊ लागली आहे. ऑक्सफर्ड बुक स्टोअरमध्ये असलेल्या चा बारमध्ये हे पदार्थ सहजपणे मिळतात. क्लारिजेस रेस्तराँमध्येही हे पदार्थ मिळतात.