काेर्ट म्हणाले - या विद्यार्थ्यांना भारतात आहोत हेच दु:ख असावे; यांना स्वातंत्र्य तरी कसे हवे आहे?
कन्हैयाचा जबाब
अफझलचे समर्थक आणि अभाविप सदस्यांत वाद पेटला तेव्हा मी तेथे पोहाेचलो. मी तर केवळ मध्यस्थी केली.
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात अफझल गुरूच्या समर्थनार्थ देशविरोधी घोषणाबाजीचा वाद चिघळत चालला आहे. पोलिसांनी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया यास शुक्रवारी अटक केली. त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला. इतर पाच आरोपी फरार आहेत.
कन्हैयाने काेर्टात आपण निर्दोष असल्याचे सांगितले. ‘मी घोषणाही देत नव्हतो की अांदाेलनही अायाेजित केले नव्हते. अभाविपच्या कार्यकर्त्यांचा या अांदाेलकांशी वाद झाला म्हणून मध्यस्थी करण्यासाठी मी गेलो होतो,’ असे कन्हैया म्हणाला. यावर पोलिसांनी घटनास्थळाचे व्हिडिओ चित्रण सादर केले. यावर दंडाधिकारी म्हणाले, ‘असे वाटते की या विद्यार्थ्यांना आपण भारतात आहोत याचेच दु:ख आहे.’ त्यांनी कन्हैयाला विचारले, ‘तुम्हाला कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य हवे आहे?’
यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, दिल्ली प्रेस क्लबमध्ये अफझलच्या समर्थनार्थ कार्यक्रम घेणारा प्रोफेसर एस. ए. आर. गिलानी याच्याविरुद्धही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
दाेषी विद्यार्थ्यांना शुद्धीवर अाणा, मुनीरका ग्रामस्थांचे अांदाेलन
दिल्लीतील मुनीरका गावच्या जमिनीवर ‘जेएनयू’ उभी अाहे. येथील नागरिकांनी विद्यापीठ गेटवर अांदाेलन करत दाेषींवर कारवाईची मागणी केली. तर अभाविपनेही इंडिया गेटवर तीव्र निदर्शने केली.
राष्ट्रविराेधी कृत्य सहन करणार नाही. अशा लाेकांवर कडक कारवाईचे अादेश पाेलिस अधीक्षकांना दिले अाहेत. दाेषींना अटक व शिक्षा हाेणारच. - राजनाथ सिंह, गृहमंत्री
पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांची जीभ का नाही कापली : कैलास
भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी टि्वट केले, ‘अाज एका माजी सैनिकाने विचारले, देशात पाकचे नारे लागावेत यासाठीच का अाम्ही प्राणपणाने लढताे? अशा लाेकांची
पुन्हा अाणीबाणी, अाता हे काम भाजपने केले अाहे : सीताराम येचुरी
माकपचे महासचिव सीताराम येच्युरी म्हणाले, ‘घाेषणा कुणी दिल्या, तुम्हाला माहिती अाहे? नाही माहीत तर विद्यार्थ्यांना का अटक केली? पाेलिस मुलींच्या हाॅस्टेलमध्ये छापे मारताहेत. असे तर अाणीबाणीतच पाहिले हाेते.’
साेशल मीडिया
} देशाच्या अान, बान, शानसाठी सैनिक प्राणाची अाहुती देतात. तर काही लाेक दहशतवाद्यांच्या मृत्यूचा शाेक साजरा करत अाहेत.
} ज्या संस्थेत अफझलसाठी प्रार्थना केली जाते तिथे कसले अाले शिक्षण
} जेएनयूचे नाव जिन्ना नक्षल युनिव्हर्सिटी करा, मग वादच मिटेल.
प्रकरण काय?
संसद हल्ल्यातील दाेषी अफझल गुरूच्या फाशीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९ फेब्रुवारीला काही विद्यार्थ्यांनी जेएनयू कॅम्पसमध्ये कार्यक्रम घेतला. त्यात भारतविराेधी घाेषणा देण्यात अाल्या. भाजप खासदार व अभाविपने तक्रार केली. पाेलिसांनी अज्ञातांविराेधात देशद्राेहाचा व गुन्हेगारी कटाचा गुन्हा नाेंदवला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जेएनयूमधील घोषणाबाजी