आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीसह 5 राज्यांना भुकंपाचे धक्के; उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग भूकंपाचा केंद्रबिंदू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीसह 5 राज्यांना भूकंपाचा धक्का बसला आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
दिल्लीसह 5 राज्यांना भूकंपाचा धक्का बसला आहे. (संग्रहित फोटो)

नवी दिल्ली-  उत्तराखंड, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना 5.5  तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. उत्तराखंड येथे भारत-चीन सीमेजवळ रुद्रप्रयाग येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक जीव मुठीत घेऊन घरातून पळाले.

 

दिल्ली आणि एनसीआरमध्ये रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तसेच, यूपीच्या मुरादाबाद आणि परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तराखंडमध्ये चमोली, उत्तरकाशी, नवीन टिहरी, देहरादून आणि हरिद्वारमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...