आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनदा ओपन हार्ट सर्जरीहोऊनही धावली मॅरेथॉनमध्ये, आता जगाला देतेय हृदय मजबूतीच्या टिप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिशेल यांच्या छातीला चिरा दिल्याचा व्रण. - Divya Marathi
मिशेल यांच्या छातीला चिरा दिल्याचा व्रण.
गोउरॉक (स्कॉटलंड)- ही कहाणी आहे मिशेल यांची. २०११ मध्ये त्यांची दोन वेळा ओपन हार्ट सर्जरी झाली. त्या वेळी त्यांचे वय होते फक्त २३ वर्षे. डॉक्टरांनी त्यांचे छातीचे हाड काढून टाकले. त्यामुळे मिशेल अशक्त झाल्या. पण त्यांना कुठल्याही परिस्थितीत आधीचेच आयुष्य हवे होते. लहानपणापासून त्या फिटनेसबाबत जागरूक असत. त्यामुळे पुन्हा मैदानात उतरल्या.
दोन वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर स्कॉटिश अर्धमॅरेथॉन (२१ किमी) आणि १० किमीची स्पर्धा पूर्ण करून त्यांनी सर्वांना चकित केले. आपल्यासारख्याच इतर लोकांनाही मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी ‘हार्ट मॅटर्स’ हेल्पलाइनशी त्या जोडल्या गेल्या. मिशेलने नुकताच माध्यमांशी संवाद साधला.

व्हयचे होते हवाई सुंदरी, मात्र हृदयात छिद्र असल्याचे कळले
‘२०११ च्या त्या रात्री मी मित्रांसह डिनर केल्यानंतर घरी आले होते. अचानक मला अटॅक आला. शरीराच्या डाव्या भागाला अर्धांगवायू झाला होता. मी बोलूही शकत नव्हते. त्यानंतर मी बेशुद्ध झाले. शुद्ध आली तेव्हा रुग्णालयात होते. चारही बाजूंनी लोक उभे होते. मी डॉक्टरांना विचारले,‘मला काय झाले?’ डॉक्टर म्हणाले, ‘हृदयात छिद्र आहे. ते ठीक करण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. मी स्तब्ध झाले. मी त्या वेळी एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेत होते. पण माझे आनंददायी जीवन या घटनेने ठप्प झाले. लवकरच माझी शस्त्रक्रिया झाली. मी लवकरच दुरुस्तही होत होते आणि आयुष्य पूर्वीप्रमाणेच जगण्याबाबत विचार करत होते.’
पुढील स्लाइड्सवर वाचा, मित्रांनी दिली नवी मिशेल बनण्याची ताकद