आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फावल्या वेळेत विद्यार्थ्यांची समाजसेवा, वेळेचा सदुपयोग करण्याचे ध्येय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुस्तकी ज्ञानाच्या बाहेर जाऊन फावला वेळ स्वयंस्फूर्तीने सामाजिक कार्यात सत्कारणी लावण्याचा प्रयत्न विद्यार्थी करताना दिसू लागले आहेत. गरजूंना आपल्या परीने मदत करण्याचा हा छंद विद्यार्थ्यांमधील सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवणारा ठरला आहे.
आपल्या आयुष्यात चांगले बदल घडावेत, यासाठी चांगले कार्य केले जाऊ नये. आपल्या कामातून इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी ते केले जावे. असे अकराव्या वर्गात शिकणार्‍या अनुष्का मंडल नावाच्या तरुणीचे म्हणणे आहे. ती मूळची कोलकात्याची आहे. लोकांना मदत करण्याची अनुष्काची पद्धत वेगळीच आहे. गुप्त सांता बनून ती ख्रिसमसच्या दिवशी गरजूंना मदत करते. तिने 2012 मध्ये हिवाळ्यात रस्त्यावर राहणार्‍या जवळपास 500 जणांना ब्लँकेट्सचे वाटप केले होते.
कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर
कोलकात्याच्या अनुष्का मंडल नावाच्या तरुणीने दोन वर्षांपूर्वी कडाक्याच्या थंडीत कुडकुडत झोपलेल्या लोकांच्या अंगावर ब्लँकेट टाकून दिलासा दिला होता. थंडीचा कडाका असताना अनुष्का रात्री मदतीसाठी फुटपाथवर गेली होती. थंडीमुळे लोकांना प्राण गमवावे लागतात, असे तिने अनेकदा ऐकले होते. त्यामुळे तिने ही युक्ती केली होती.

इंग्लिश शिकवण्याचे वेड
बारावीत शिकणारी गुडगावची मनेकादेखील अशीच सामाजिक कार्याचे वेड असलेली तरुणी. मी झोपडपट्टी भागातील मुलांना इंग्लिश शिकवते. भाषा शिकवत असतानाच मी तेथील संपर्कात असलेल्या मुलींना पाण्याची जपणूक कशी करायची, हेदेखील शिकवते, असे मनेकाने सांगितले. आकाश पवार नावाचा मुलगा बालविवाह, बालमजुरी यासारख्या सामाजिक कुप्रथांच्या विरोधात काम करतो. तो अकराव्या वर्गात शिकतो.

एक हात स्वत:साठी, दुसरा समाजाला
आपल्याला दोन हात आहेत. एक स्वत:साठी आहे. दुसरा समाजातील गरजूंसाठी आहे. सध्याच्या काळात लोक दोन्ही हात केवळ स्वत:च्या कल्याणासाठीच वापरू लागले आहेत. म्हणूनच आपण समाजासाठी काहीतरी वेगळे केले पाहिजे. आकाश, विद्यार्थी, अकरावा वर्ग.