आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टंट करणारा दुचाकीस्वार पोलिसांच्या गोळीबारात ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विंडसर प्लेस भागात रस्त्यावर कसरती करणा-या एका दुचाकीस्वाराचा पोलिस गोळीबारात मृत्यू झाला. अन्य एक जण जखमी आहे. पोलिस सूत्रांनुसार रात्री सुमारे दीडशे दुचाकीस्वार या भागात कसरती करत होते. पोलिसांनी त्यांना मज्जाव केला तेव्हा दुचाकीस्वारांनी दगडफेक केली. यात काही पोलिस जखमी झाले. पोलिसांनी दुचाकीच्या टायरच्या दिशेने गोळी झाडली. नेमक्या त्याच वेळी पुनीत शर्मा या तरुणाने स्टंट दाखवत दुचाकी मागच्या चाकावर उभी केली. त्यामुळे गोळी चाकावर लागण्याऐवजी मागे बसलेल्या करण पांडे याला लागली. त्याचा मृत्यू झाला तर पुनीत जखमी झाला.