आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलपीजी सबसिडीचा मुहूर्त लांबणीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एलपीजी ग्राहकांना सिलिंडरवर दिली जाणारी सबसिडी थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आता 15 मेऐवजी 1 जून रोजी आरंभ होणार आहे.

अर्थ मंत्रालयाने घाई गडबडीत ही योजना जाहीर केली होती, प्रत्यक्ष अंमलबजावणीत अडचणी दूर करता आल्या नाहीत. त्यामुळे ही योजना नेमकी कधी सुरू होईल याबाबत अर्थ आणि पेट्रोलियम मंत्रालयच साशंक आहेत. एलपीजीचा काळाबाजार रोखण्यासाठी अर्थ मंत्रालयाने लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला होता. अधिकार्‍याने सांगितले की, यात काही अडचणी असून त्या दूर करण्याचा केल्या जात आहेत.

पर्यायांबाबत विचारच नाही
त्यासाठी प्रत्येक एलपीजी ग्राहकांचा ‘आधार’ क्रमांक त्याच्या एजन्सीवर घेतला जाणार होता. नंतर हा क्रमांक ग्राहकाच्या बँक खात्याशी संलग्न करायचा होता. मात्र, यात अनेक प्रकारच्या व्यावहारिक अडचणी होत्या. योजनेची घोषणा करण्यापूर्वी त्या दूर करण्यात आल्या नाहीत. यात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ग्राहकाचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करणे हे होते. त्याशिवाय शंभर टक्के आधार क्रमांक कुठल्याही जिल्ह्यात देण्यात आलेले नाहीत. अशा परिस्थितीत काय पर्याय असेल त्याचा विचार झाला नाही. त्यामुळेच ही योजना 15 मेपासून सुरू होऊ शकणार नाही.