आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subhash Chandra Bose Malviya Kanshi Ram Atalbihari Well Likely To Get Bharat Ratna

वाजपेयी, बोस, कांशीराम आणि मालवीय यांना 'भारतरत्न'ची तयारी! 5 मेडलची दिली ऑर्डर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेताजी सुभाषचंद्र बोस, बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक आणि स्वातंत्र्य सैनिक मदन मोहन मालवीय, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याची तयारी केंद्रातील मोदी सरकारने चालवली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सांगण्यावरुन घेतला असल्याची चर्चा आहे. या सर्वोच्च सन्मानाची घोषणा स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) होण्याची शक्यता आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेला पाच भारतरत्न पदक बनविण्याचे सांगितले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदकांची मागणी केल्यामुळे यंदा एका पेक्षा अधिक व्यक्तिंना सन्मानित केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, असेही नाही की पाच व्यक्तिनांच सन्मानित केले जाईल.
सध्याच्या कायद्यानुसार, एकावेळी जास्तीत जास्त तीन व्यक्तिंना भारतरत्नने सन्मानित केले जाऊ शकते. जर मोदी सरकारला तीन पेक्षा अधिक व्यक्तिंना सन्मानित करायचे असेल तर, नियमांमध्ये बदल करावे लागतील. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक प्रकारे संदेश देऊ इच्छितात त्यांच्याआधीच्या यूपीए सरकारने ज्या दिग्गजांचे कार्य नजरेआड केले त्यांचा मोदी सरकारने सन्मान केला आहे.
गेल्या वर्षी यूपीए सरकारने सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ सीएनआर राव यांना भारतरत्नने सन्मानित केले होते. आता पर्यंत 43 जणांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यातील 11 जणांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला. पहिला भारतरत्न पुरस्कार सी. गोपालचारी यांना देण्यात आला होता. खान अब्दुल गफ्फार खान आणि नेल्सन मंडेला यांचाही भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नने गौरक करण्यात आला होता.