आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subhrata Roy News In Marathi, Supreme Court, Sahara Group, Divya Marathi

सहाराचा फॉर्म्युला म्हणजे आमचा घोर अपमान - सर्वोच्च न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सहारा समूहाचे मालक सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पुन्हा झटका दिला. गुंतवणूकदारांना 3 दिवसांत 2500 कोटी व उर्वरित 14,900 कोटी रुपये जुलै 2015 पर्यंत पाच टप्प्यांत परत करण्याचा सहाराचा फॉर्म्युला न्यायालयाने फेटाळला. हा फॉर्म्युला म्हणजे आमचा घोर अपमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया कोर्टाने दिली. दरम्यान, सेबीने सांगितले, सहारा फक्त 17,400 कोटींची गोष्ट करत आहे. प्रत्यक्षात व्याजासह ही रक्कम 34,000 कोटी रुपये आहे.

कोर्ट लाइव्ह । प्रत्येक युक्तिवाद फेटाळला गेला
सहाराने सांगितले, 5 टप्प्यांत गुंतवणूकदारांची सर्व रक्कम परत करू
समूह तीन दिवसांत 2500 कोटी जमा करेल. उरलेले 14,900 कोटी रुपये दर तीन महिन्यांत एक टप्प्याप्रमाणे पाच टप्प्यांत फेडू.
कोर्टाने सहाराला फटकारत सांगितले, ठोस प्रस्ताव नव्हता तर आलेच का?
स्वतंत्र न्यायपीठाची तुमची मागणी पूर्ण केल्यानंतर आता तुम्ही टप्प्यांत पैसे परत करण्याची गोष्ट करत आहात. हा आमचा अपमान आहे.
सहाराची हतबलता, जो पैसे जमवू शकतो तो तुरुंगात आहे. त्याची सुटका करा.
सहाराचे वकील म्हणाले, सध्या आणखी पैसे जमवणे शक्य नाही. पैसे उभारू शकणारी व्यक्ती (सुब्रतो राय) तुरुंगात आहे. त्यांची सुटका करावी.
कोर्ट म्हणाले, ते तर दोनच दिवसांपासून तुरुंगात आहेत. आतापर्यंत काय केले?
गेल्या काही दिवसांपासूनच ते (सुब्रतो) जेलमध्ये आहेत. गेल्या दीड वर्षांपासून तर ते मोकळेच होते. तेव्हाच पैसे का परत केले नाहीत...!
सहाराचा युक्तिवाद, आतापर्यंत एकाही गुंतवणूकदाराने तक्रार नोंदवलेली नाही.
वकिलांचा युक्तिवाद, सहाराच्या 14 लाख कर्मचा-यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. तसेच एकाही गुंतवणूकदाराने समूहाविरुद्ध तक्रार केलेली नाही, हेही एक तथ्य आहे.
कोर्टाचा सवाल, एखादा गुंतवणूकदार खरा आहे का? तपासात सर्वच खोटे आढळले
ख-या गुंतवणुकदाराने पैसे लावले आहेत का? तपासात सर्वच गुंतवणूकदार बनावट निघाले.


एक मागणी मान्य, दुसरी फेटाळली
1. सल्लामसलतीसाठी रॉय यांना भेटू दिले जात नाही?
कोर्ट - ठीक आहे. रोज 10 ते 12 वेळा भेटू शकतात.
2. सहाराने सुब्रतोंना न्यायालयीन कोठडीतून पोलिस कोठडीत पाठवण्याची मागणी केली. कोर्टाने मात्र ती फेटाळली.