आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी म्हणाले- कोटमध्ये मंत्री वेटरसारखे दिसतात, वढेरांचा टोला- सन्मान ठेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना रॉबर्ट वढेरा यांनी टोला हाणला आहे. - Divya Marathi
खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना रॉबर्ट वढेरा यांनी टोला हाणला आहे.
नवी दिल्ली - भाजप मंत्र्यांनी परदेशा दौऱ्यात टाय आणि सुट वापरण्यावरुन त्यांच्यावर तिरकस हल्ला करणारे पक्षाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना रॉबर्ट वढेरा यांनी टोला हाणला आहे. ते म्हणाले, '...मग वेटरला काय आत्मसन्मान नसतो का ?' वढेरांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ही कॉमेंट केली आहे.
काय म्हणाले होते स्वामी

कोट, टायमध्ये वेटर : स्वामींनी वृत्तपत्रातील एका छायाचित्रावरून शुक्रवारी जेटलींवर टीका केली होती. बीजिंगमध्ये बँक ऑफ चायनाच्या बैठकीत जेटलींनी हजेरी लावल्याचे छायाचित्र शुक्रवारच्या अंकात झळकले होते. त्यावर स्वामींनी तिरकस प्रतिक्रिया दिली. परदेशात वावरताना मंत्र्यांनी पारंपरिक किंवा आधुनिक भारतीय कपडे परिधान करून जायला हवे. काही मंत्री कोट व टायमध्ये वेटरसारखे दिसू लागतात, असा टोला त्यांनी लगावला होता.

- सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी शनिवारी त्यांच्या फेसबुक पेजवरुन स्वामींचा समाचार घेतला. त्यांनी लिहिले, ' कायम लक्ष वेधून घेणारे कॉमेंट करणारे भाजप खासदार स्वामी यांनी कोट परिधान करणाऱ्या मंत्र्यांना वेटर म्हणून वेटरचा अपमान केला आहे. त्यांचे वक्तव्य हे वर्गवादी आणि अपमानजनक आहे. त्यांच्या दृष्टीने वेटरला त्याचा आत्मसन्मान नसतो का ?' असा सवाल वढेरा यांनी उपस्थित केला आहे.

आणखी काय म्हणाले स्वामी
भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आता सरकारला घरचा आहेर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन, चीफ इकॉनॉमिक अॅडव्हाझर अरविंद सुब्रमण्यम आणि इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी शक्तीकांत दास यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव न घेता त्यांचाही समाचार घेतला होता. आता अशी माहिती समोर येत आहे की स्वामींचे हे सर्व कारनामे प्रोफेसर आर.वैद्यनाथन यांना भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर करण्यासाठी सुरु आहेत. स्वामींनी आधीही त्यांच्या नावाची शिफारस केली होती.
गेल्या वर्षी केली होती शिफारस
- रघुराम राजन यांना आरबीआय गव्हर्नर पदाचा दुसरा कार्यकाळ मिळू नये यासाठी स्वामींनी पद्धतशीर टीका-टीप्पणी सुरु केली होती.
- जेव्हा राजन यांनी स्वतः दुसऱ्या टर्मसाठी नकार दिला त्यानंतर स्वामींनी अशा लोकांवर निशाणा साधला जे गव्हर्नर पदाच्या रेसमध्ये आघाडीवर राहू शकतात.
- राजन यांच्यानंतर स्वामींनी चीफ इकॉनॉमिक अॅडव्हाझर अरविंद सुब्रमण्यम आणि इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी शक्तीकांत दास यांच्याकडे मोर्चा वळवला होता. हे दोघे या पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र सरकारने अद्याप यानावांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
- मीडिया रिपोर्टनुसार स्वामींची इच्छा आहे, की प्रोफेसर वैद्यनाथन गव्हर्नर व्हावे.
- गेल्या वर्षी त्यांनी एक ट्विट करुन वैद्यनाथन यांची या पदासाठी शिफारस केली होती.
- स्वामींनी हे ट्विट 20 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 7.53 वाजता केले होते.
- त्यांनी ट्विट केले होते,की 'पंतप्रधानांनी आरबीआय गव्हर्नरला हटवले पाहिजे.'
पक्षाचे सध्या वेट अँड वॉच
स्वामी यांनी भाजप सरकारमधील मंत्री, अधिकाऱ्यांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने त्याचा सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत अाहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर नाराजी व्यक्त केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. स्वामींच्या वक्तव्यावर पक्ष नेतृत्वाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असली तरी त्यांच्यावर एवढ्यात काही कारवाई केली जाणार नाही. काही दिवस पक्षाकडून ‘थांबा आणि पाहा’ चे धोरण अवलंबिले जाणार आहे. स्वामींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याची चर्चा होते. परंतु अशा बेताल वक्तव्याबद्दल संघ स्वामींच्या मुळीच पाठीशी राहणार नाही, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...