आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी यांचे आगीत तेल, म्हणाले- जंग आणखी एक ४२०! संघाचाच माणूस हवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत सर्व काही आलबेल नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विराेधात मोर्चा उघडलेला आहे. सचिवांच्या बदल्यांवर त्यांनी नजीब जंग यांना लक्ष्य केले. या वादात आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही उडी घेतली आहे. नायब राज्यपाल आणखी एक ४२० आहेत, असे ट्विट करून त्यांनी नवा वाद आेढवून घेतला आहे.
नायब राज्यपालांनी अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांच्या फायली मुख्यमंत्री किंवा इतर कोणासही दाखवण्यात आलेल्या नाहीत. काय हीच मोदींची लोकशाही आहे ? मोदीजी नायब राज्यपालांच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत बरबाद करू इच्छितात. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नायब राज्यपालांना अनेकवेळा आग्रह केला. अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नका, अशी विनंती त्यांनी अनेकदा केली. परंतु जंग यांनी त्याकडे कानाडोळा केला. दुसरीकडे आम आदमी पार्टीचे मंत्री सत्यंेद्र जैन म्हणाले, नायब राज्यपाल दिल्ली सरकारच्या प्रत्येक कामात अडसर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.नायब राज्यापालांनी दिल्लीचे आरोग्य सचिव तरूण सेन बांधकाम विभागाचे सचिव सर्वज्ञ श्रीवास्तव यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यावरून केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक आप सरकारने दिल्लीत आरोग्य शिक्षण क्षेत्रात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली आहे. जंग यांच्या आदेशाने त्या प्रकल्पांना सुरूंग लागणार आहे.

संघाचाच माणूस हवा
दिल्लीत नायब राज्यपाल पदावरील जंग पदासाठी लायक नाहीत. ते केजरीवाल यांच्यासारखे आणखी एक ४२० आहेत. वास्तविक आम्हाला या उच्च पदावर एका पात्र व्यक्तीची गरज आहे. त्यासाठी संघाचा माणूस हवा आहे.

मोहल्ला क्लिनिक यशस्वी
दिल्लीसरकारने राजधानीत १०५ मोहल्ला क्लिनिक सुरू केले आहेत. त्यांची संख्या हजारावर नेण्याची योजना आहे. त्याशिवाय हजार शाळा खोल्यांचे कामही प्रगतीपथावर आहे. अशा कल्याणकारी योजना रोखण्यात येत आहेत. देशभरात त्याचे कौतुक होत आहे. दिल्लीकरांना त्याचा लाभ मिळू लागला आहे. त्यामुळेच आता दिल्लीतील आरोग्य शिक्षण सेवा कोसळल्यास त्याला पंतप्रधान मोदी हेच जबाबदार असतील. त्यांनी दोन सचिवांना पदावरून हटवून हे काम केले आहे, असा आरोप सिसोदिया यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्वामींचे ट्विट बाण...
बातम्या आणखी आहेत...