आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subrata Ray News In Marathi, Supreme Court Bail Granted, New Delhi

\'सहाराश्रीं\'ना दिलासा; सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिलासा दिला आहे. सुब्रतो रॉय यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पहिल्या हप्त्यात 10 हजार कोटी भरण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहे. रॉय गेल्या चार मार्चपासून तिहार कारागृहात कैदेत आहे.

10 हजार कोटी रुपये अमानत रक्कम कोर्टात भरल्यानंतरच सुब्रतो रॉय यांची जामिनावर सुटका होणार आहे. सुब्रतो रॉय यांना आधी पाच हजार कोटी रोख आणि पाच हजार कोटी बॅंक गॅरंटी द्यावी लागणार आहे. या प्रकरणी गुरुवारीही सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी परत करण्यासाठी सहारा समूहाने मंगळवारी नवा प्रस्ताव सादर केला होता. परंतु सुप्रीम कोर्टाने त्यावर विचार करण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे सुब्रतो रॉय यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला. प्रस्ताव सुनावणीच्या एका दिवसाआधी आणण्याचे निर्देश यापूर्वीच कोर्टाने दिले होते.

असा होता सहाराचा नवा प्रस्ताव...
> वर्षभरात 20 हजार रुपये टप्प्याटप्प्यांत परत केले जाणार.
> अडीच हजार कोटींचा पहिला हप्ता तीन दिवसांत देऊ.
> 3500 कोटींचे तीन हप्ते जून, सप्टेंबर व डिसेंबरमध्ये अदा केले जातील.
> उर्वरित 7 हजार कोटी पुढील वर्षी 15 मार्चपर्यंत अदा केले जातील.