आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subrata Roy Makes Fresh Offer For His Release News In Divya Marathi

2500 कोटी चार दिवसांत जमा करू; सुब्रतो रायच्या जामिनासाठी सहाराचा नवा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या 4 मार्चपासून तुरुंगात असलेले सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो राय यांच्या जामिनावर गुरुवारीही सुप्रीम कोर्टात निर्णय होऊ शकला नाही. गुंतवणूकदारांची देणी देण्यासाठी समूहाने सुप्रीम कोर्टात नवा प्रस्ताव सादर केला असून त्यानुसार चार दिवसांत अडीच हजार कोटी व उर्वरित रक्कम दोन महिन्यांत दिली जाईल, असे या प्रस्तावात म्हटले आहे. याशिवाय 5 हजार कोटींची बँक हमी याच काळात देण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. यावर सुप्रीम कोर्ट सोमवारी सुनावणी करेल. गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी सुब्रतोंसह कंपनीचे दोन संचालक गेल्या 4 मार्चपासून तुरुंगात आहेत.

सुब्रतोंच्या जामिनासाठी सुप्रीम कोर्टाने गुंतवणूकदारांना परत करावयाच्या 10 हजार कोटी इतकी रक्कम जमा करण्याची अट घातली आहे. यातील 5 हजार कोटी रोख आणि उर्वरित 5 हजार कोटी बँक हमीच्या स्वरूपात जमा करावी, असे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, सुब्रतोंना न्यायालयीन कोठडीत ठेवणे घटनेने नागरिकांना दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचा युक्तिवाद करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली असून यावर सध्या सुनावणी सुरू आहे.