आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subrata Roy News In Marathi, Sahara, Supreme Court

देशाकडून सर्वोत्कृष्ट सन्मान मिळाला, सुब्रतो रॉय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सहारा उद्योग समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय आज (शुक्रवार) लखनौ पोलिसांसमोर शरण आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली, अशी माहिती राम जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. त्यांना 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, आजारी आईला बघण्यासाठी सुब्रतो रॉय लखनौला गेले होते. त्यानंतर ते तेथील निवासस्थानी थांबले होते, असे त्यांचा मुलगा सिमांतो रॉय यांनी सांगितले आहे. देशाकडून मला सर्वोत्कृष्ट सन्मान मिळाला, अशी उपरोधक प्रतिक्रिया सुब्रतो रॉय यांनी अटक झाल्यावर दिली आहे.
अटक करण्यासाठी लखनौ येथील निवासस्थानी गेलेले पोलिस काल रिकाम्या हातांनी परतले होते. त्यानंतर रॉय यांनी आज (शुक्रवार) सकाळी म्हटले होते, की मी फरार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे कोणत्याची परिस्थिती पालन करण्याची माझी तयारी आहे.
या प्रकारची मानहानी आणि मानसिक छळ सहन करू शकत नाही, असे सांगत सुब्रतो रॉय म्हणाले, की मी फरार होणारी व्यक्ती नाही. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली तर मी माझ्या आजारी आईसोबत माझ्याच घरात नजरकैदेत राहू शकतो. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पोलिसांनी त्यांची ड्युटी करावी, असे मी त्यांना सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुब्रतो रॉय यांना अटक करण्यासाठी अजामिनपात्र अटक वॉरंट काढला आहे. त्याला काल रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 4 मार्च रोजी न्यायालयासमोर हजर होण्याचे आश्वासनही रॉय यांनी दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी रॉय यांना अटक करून 4 मार्च रोजी न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे पोलिस त्यांना अटक करण्यासाठी लखनौ येथील त्यांच्या निवासस्थानी गेले होते.
पुढील स्लाईडवर वाचा सुब्रतो रॉय यांनी जाहीर केलेले पत्रक...