आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subrata Roy News In Marathi, Suprem Court, Manoj Sharma

सुब्रतोंवर शाई फेकणा-या वकीलाची रवानगी तिहार तुरुंगात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाच्या आवारात शाई फेकणारा कथित वकील मनोज शर्मा याची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. जामिनासाठी जातमुचलक्याची रक्कम जमा केली नसल्याने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी असलेले सुब्रतो रॉय यांना मंगळवारी सुप्रीम कोर्टाने 11 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून ते सध्या तिहार तुरुंगातच आहेत. त्यांच्यावर शाई फेकणार्‍यालाही आता त्याच तुरुंगात पाठवण्यात आले आहे.