आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुब्रतो रॉय यांनी तुरुंगात राहूनच संपत्ती विकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सहारा प्रमुख सुब्रतो रॉय त्यांची संपत्ती विकण्यासाठी खरेदीदारांशी तिहार तुरुंग परिसरातून बोलणी करू शकतात. ही बोलणी व्यक्तिगत स्वरूपात किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. बोलणी करण्यासाठी तुरुंग परिसरातच एखादी जागा शोधण्याचे आदेश कोर्टाने दिल्ली सरकारला दिले आहेत. ही व्यवस्था संपत्ती विक्रीपुरती किंवा खरेदीदारांना बोलण्यापुरतीच उपलब्ध असेल, असेही न्यायालयाने बजावले.
गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी सुब्रतो रॉय गेल्या पाच महिन्यांपासून तिहार तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायलयाने रॉय यांना 10 हजार कोटी रुपये सेबीकडे जमा करण्याची अट घातली आहे. त्याबाबत सेबीसी त्यांचा वाद सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांत रॉय यांनी जामिनासाठी अनेक प्रकारे अर्ज करून पाहिला. परंतु दरवेळी तो कोर्टाकडून फेटाळण्यात आला. आताही सहारा समूहाची संपत्ती विकण्यासाठी बोलणी करण्यासाठी रॉय यांनी बाहेर येणे गरजेचे आहे, असा दावा त्यांच्यातर्फे करण्यात आला होता. परंतु न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शुक्रवारी तो दावा फेटाळला. तुरुंगात गेस्ट हाऊस किंवा कोर्टरूममध्ये बसून सुब्रतो रॉय खरेदीदारांशी बोलू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
यांसदर्भात न्यायालयाने दिल्ली सरकारला 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.