आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subrata Roy News In Marathi, Supreme Court Delhi

सुब्रत राय यांना सुप्रीम कोर्टाची मुभा; हवे तर जेलबाहेर जा आणि संपत्ती विका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रत राय यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. संपत्ती विकण्यासाठी त्यांना रोज सहा तास तुरुंगाबाहेर जाण्याची मुभा दिली जाऊ शकते. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी न्यायमूर्ती टी.एस. ठाकूर यांच्या न्यायपीठाने राय यांना न्यूयॉर्क व लंडनमधील हॉटेलसह नऊ मालमत्ता विकण्याची परवानगी दिली. यासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही तुरुंगाबाहेर जाऊ शकता. मात्र ठोस प्रस्ताव (संपत्ती विक्रीबाबत) आला तरच ही व्यवस्था होईल, असे न्यायालयाने त्यांना सांगितले.
सुब्रत राय यांनी न्यायालयाकडे 40 दिवसांसाठी जामीन मागितला होता. त्यांना न्यायालयाने सेबीकडे 10 हजार कोटी रुपये जमा करून जामीन घेण्याची अट ठेवली आहे. सहारा समूहाने आतापर्यंत केवळ 3 हजार कोटी रुपयेच जमा केले आहेत.

नाफडे बनले न्यायमित्र
सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील शेखर नाफडे यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. ते सहारा समूहाविरूद्ध सुरू असलेल्या 37 हजार कोटी रुपये अदा करण्याच्या प्रकरणात न्यायालयाची मदत करतील.