आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुब्रतोंना पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ! वकिलाच्या बेलगाम युक्तिवादाचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो राय यांना राजीव धवन या त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या बेलगाम युक्तिवादामुळे पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली. पॅरोलवर असलेले सुब्रतो यांना सहाराचे संचालक अशोक रॉय चौधरी आणि रविशंकर दुबे यांच्यासह पुन्हा तुरुंगात टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सुब्रतो अडचणीत आल्याचे पाहून त्यांचे दुसरे वकील कपिल सिब्बल ताप असतानाही हजर झाले. त्यांनी सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांची माफी मागितली. शिवाय धवन यांचे वकीलपत्रही काढून घेतल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने सुब्रतोंना ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा स्वत:हून हजर राहण्याची मुभा देऊ केली.
सुब्रतोंचा पॅरोल ३० सप्टेंबरपर्यंत वाढवून मिळावा म्हणून अॅड. धवन बाजू मांडत असताना न्यायालयाने पूर्वी जमा केलेल्या रकमेशिवाय आणखी ३०० कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्यावर धवन आक्रमक झाले होते. यामुळे न्यायालयाने पॅरोल नाकारून सुब्रतोंना तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले होते.
बातम्या आणखी आहेत...