आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subsidised Gas Cylinder News In Marathi, Union Government, Divya Marathi

अनुदानित सिलिंडरची संख्या कमी करण्याच्या दिशेने सरकारची पावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनुदानित सिलिंडरची संख्या कमी करण्याच्या दिशेने सरकारची पावले असल्याचे दिसून आले आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची वर्षाकाठी लागणारी सरासरी 6 वरून आता 6.4 वर आली असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तथापि, सध्या अनुदानित सिलिंडरचा कोटा 12 आहे. तिन्ही तेल कंपन्यांनी देशभरातील एप्रिल-मेपर्यंतची आकडेवारी काढली असून, त्यावरून खप घटल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

तेल कंपन्यांकडील आकडेवारीचा हा निष्कर्ष असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयातील एका अधिका-याने म्हटले आहे. अनुदानित सिलिंडरची संख्या कमी करण्याशी त्याचा संबंध जोडला जाऊ नये. संख्या कमी करण्याचा सरकारचा इरादा नाही, असे हा अधिकारी म्हणाला. एखाद्या राज्यात एखाद्या कंपनीचा खप कमी-अधिक दिसत असेल तर त्या कंपनीचे ग्राहक कमी असतील. तेथे दुस-या कंपनीचा खप अधिक दिसेल, अशी पुष्टीही अधिका-याने जोडली.

वर्षाकाठी सिलिंडरचा खप
कंपनी 2011-12 2012-13
इंडियन ऑइल 7.1 6.7 6.5
भारत पेट्रोलियम 7.1 6.5 6.2
हिंदुस्थान पेट्रोलियम 7 6.6 6.3