आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानित LPG सिलिंडर 8 रुपयांनी महाग, विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 74 रुपये वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 8 रुपयांनी आणि विना अनुदानित सिलिंडर 74 रुपयांना महाग झाले आहे. नवे दर आजपासून (शुक्रवार) लागू झाले आहे. दिल्लीमध्ये अनुदानित सिलिंडर 487.18 रुपयांना मिळणार आहे. दरवाढीपूर्वी त्याची किंमत 479.77 रुपये होती. 
 
सरकारचा दरमहिन्याला 4 रुपये दरवाढीचा प्रस्ताव 
- केंद्र सरकारने अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात मार्चपर्यंत दर महिन्याला 4 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. दर महिन्याला वाढ करुन सरकार मार्च 2018 पर्यंत घरगुती वापराच्या सिलिंडरवरील अनुदान बंद करण्याच्या विचारात आहे. 
- पेट्रोलिय मंत्री धर्मेंद्र प्रधान संसदेत म्हणाले होते, गेल्या वर्षी सरकारने तेल कंपन्यांना घरगुती वापराच्या (14.2KG) एलपीजी सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला 2 रुपयांनी वाढवण्याचे आदेश दिले होते, मात्र आता ते 2 रुपयांवरुन दर महिन्याला 4 रुपये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 
 
कितीमध्ये मिळेल सिलिंडर?
- नव्या दरानुसार, दिल्लीत विनाअनुदानित सिलिडंर 597.50 रुपयांना मिळेल. आधी त्याची किंमत 524 रुपये होती. 
- सरकार एका आर्थिक वर्षात ग्राहकांना 12 अनुदानित सिलिंडर देते. त्यापेक्षा जास्त सिलिंडर हवे असल्यास ते विनाअनुदानित दराने घ्यावे लागतात. 
- याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांना अनुदानाची आवश्यकता नाही अशा ग्राहकांना अनुदान सोडण्याचा आग्रह केला होता. 
 
गेल्या सहा वर्षातील सर्वात मोठी दरवाढ 
मेमध्ये सरकारने जारी केलल्या दरवाढीच्या आदेशानंतर आणि जीएसटी लागू झाल्यानंतर तेल कंपन्यांनी दोन वेळा सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. जुलैमध्ये एकाचवेळी 32 रुपये वाढ करण्यात आली. गेल्या सहा वर्षांतील ही सर्वात मोठी दरवाढ होती. 
 
अनुदानित ग्राहक किती? 
- देशभरात 18 कोटींपेक्षा जास्त ग्राहक अनुदानित गॅस सिलिंडरचा लाभ घेतात. यात गेल्या वर्षी पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात आलेल्या 2.5 कोटी कनेक्शनचाही समावेश आहे. 
- 2.66 कोटी ग्राहक हे विनाअनुदानित सिलिंडरचा वापर करतात. 
बातम्या आणखी आहेत...