आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CBI कडून छळ म्हणाले, ‘तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घालू, अख्खे कुटुंब मागेल मृत्यू’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नऊ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी काॅर्पोरेट मंत्रालयाचे बडतर्फ अधिकारी बी. के. बन्सल आणि त्यांचा मुलगा योगेश यांची सुसाइड नोट बुधवारी लोकांसमोर आली. आत्महत्या करण्यापूर्वी बन्सल यांनी माध्यमांना ती पाठवली होती. २७ सप्टेंबरला बन्सल व त्यांच्या मुलाचा मृतदेह त्यांच्या फ्लॅटमध्येच सापडला होता. सुसाइड नोटवर तारीख २६ सप्टेंबरची आहे. बन्सल यांची
सुसाइड नोट...
> सीबीआयच्या छळास कंटाळून मी आत्महत्या करत आहे. १८-१९ जुलै रोजी सीबीआय अधिकारी रेखा सांगवान आणि अमृता कौर यांनी माझा भयंकर छळ केला. माझ्या पत्नीला मारले, शिव्या दिल्या. माझ्यासमाेर डीआयजी संजीव गौतम यांनी दूरध्वनीवर महिला अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘इतका छळ करा की माल-लेकी संपल्याच पाहिजेत.’ ते म्हणाले होते की, ‘तुझी पत्नी आणि मुलीस अशी अद्दल घडवेन की नावाचा सीबीआय डीआयजी नाही. तुमच्या पिढ्यासुद्धा माझे नाव ऐकून घाबरतील, सीबीआयला कायम लक्षात ठेवतील.’ चूक माझी होती तर माझी पत्नी आणि मुलीस आत्महत्या करण्यास का भाग पाडले? दोन महिलांची ही हत्याच होती. डीआयजी, दोन्ही महिला अधिकारी आणि हवालदाराची लाय डिटेक्टर टेस्ट करावी. डीआयजी म्हणत होते, मी बड्या नेत्याचा माणूस आहे. माझे कोण काय वाकडे करेल? एक महिला अधिकारी तर पत्नीला म्हणाली, तुझा मुलगा आणि पतीचे तुकडे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घालू. दुसरीकडे मला धमकावले, ‘तुझी पत्नी आणि मुलीचे असे हाल करू की अख्खे कुटुंब मृत्यूसाठी याचना करेल. पण मृत्यूही येणार नाही. तपास अधिकारी प्रमोद त्यागी खूपच जबाबदार माणूस आहे. त्यांनी अनेकद धीर दिला. माझी पत्नी आणि मुलीची सीबीआयने एकप्रकारे हत्याच केली. हे सहन होत नाही. जगण्याची इच्छाच संपली आहे. म्हणून मी जीवन संपवत आहे... अलविदा.’
भारत माता की जय हो.- बालकृष्ण बन्सल.
मुलगा योगेशने सुसाइड नोटमध्ये दिली सीबीआय अधिकाऱ्यांची नावे
बन्सल यांचा मुलगा याेगेशने आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले की... माझी आई धार्मिक व श्रद्धाळू होती. बहीण दिल्ली विद्यापीठातील गोल्ड मेडॅलिस्ट. सीबीआयच्या ५ अधिकाऱ्यांनी आई व बहिणीचा खूनच केला. त्यांच्यामुळेच मी आत्महत्या करत आहे.
१. डीआयजी संजीव गौतम.
२. एसपी अमृता कौर.
३. डीएसपी रेखा सांगवान.
४. आयओ हरनामसिंग
५. एक हवालदार... पहिल्या दिवशी छाप्यात तो सहभागी होता.

पुढील स्लाइडवर पाहा, लोकांसमोर आलेली सुसाइड नोट...
बातम्या आणखी आहेत...